नवी Honda Activa आकर्षक डिझाइनमध्ये दिसणार; बहुप्रतिक्षीत स्कूटरचं अधिकृत पोस्टर आलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 04:06 PM2022-08-12T16:06:15+5:302022-08-12T16:08:32+5:30

Honda Activa Scooter आता नव्या मॉडलसह बाजारात लॉन्च करण्याची तयारी कंपनीनं केली आहे.

honda activa scooter new teaser out and know top 5 leak feature | नवी Honda Activa आकर्षक डिझाइनमध्ये दिसणार; बहुप्रतिक्षीत स्कूटरचं अधिकृत पोस्टर आलं!

नवी Honda Activa आकर्षक डिझाइनमध्ये दिसणार; बहुप्रतिक्षीत स्कूटरचं अधिकृत पोस्टर आलं!

Next

Honda Activa Scooter आता नव्या मॉडलसह बाजारात लॉन्च करण्याची तयारी कंपनीनं केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कंपनीनं अपकमिंग ऑफिशियल पोस्टर लॉन्च केलं आहे. यात कंपनीनं आगामी अ‍ॅक्टीव्हा स्कूटरचं डिझाइन दाखवलं आहे. Honda Activa चं हे 7G मॉडल असणार आहे असं सांगितलं जात आहे. नव्या स्कूटरबाबत आता अधिकृत माहितीसह काही लीक्स देखील समोर आले आहेत. 

सज्ज व्हा! होंडाची नवी Activa येतेय, कंपनीकडून लूक जारी; कशी दिसते पाहा...

नव्या होंडा अ‍ॅक्टीव्हामध्ये तीन व्हेरिअंट दिसण्याची शक्यता आहे. यात स्टॅण्डर्ड, स्पोर्ट्स आणि नॉर्मल असे व्हेरिअंट देण्यात येतील. नव्या स्कूटरमध्ये १०० सीसीचं फॅन कूल ४ स्ट्रोक इंजिन देण्यात येईल. हे इंजिन ७.६८ बीएचपी पावर आणि ८.७९ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करेल. नव्या स्कूटरमध्ये एलईडी हेडलाइट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल देण्यात येईल. जे होंडा अ‍ॅक्टीव्हा 6G पेक्षा उत्तम असणार आहे. होंडा अ‍ॅक्टीव्हा 7G मध्ये आकर्षक डिझाइन आणि नव्या रंगाची थीम देण्यात येणार आहे. पण या सर्व लीक्सबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.  

नव्या स्कूटरकडून अपेक्षा कोणत्या?
Honda नं जर 7G मॉडेल लॉन्च केलं, तर त्यात 6G मध्ये नसलेली सर्व वैशिष्ट्ये असतील. Activa 6G सध्या BS6 इंजिन आणि काही नव्या फिचर्ससह उपलब्ध आहे. Active 7G मध्ये काही नवीन पॉवर फीचर्स दिले जाऊ शकतात, जसे की 110 cc मोटर इंजिन 7.68 bhp आणि 8.79 Nm पॉवर जनरेट करेल. याशिवाय अशा काही गोष्टी असतील ज्या 6G मध्ये नाहीत. तसंच नव्या स्कूटरमध्ये पेट्रोल टँकची जागा बदलण्यात येणार का हे पाहणं देखील महत्वाची असणार आहे. 

Web Title: honda activa scooter new teaser out and know top 5 leak feature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.