Honda भारतात आणतेय 150 CCची नवी बाईक, जबरदस्त लुकसह मिळणार खास फीचर्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 11:25 PM2022-04-03T23:25:02+5:302022-04-03T23:26:00+5:30
जर ही नवी मोटरसायकल देशात लाँच झाली तर बाजारात तीची टक्कर थेट Yamaha R15 V4 सोबत असेल.
नवी दिल्ली - होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (Honda Motorcycle And Scooter India) लवकरच सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय स्पोर्टबाईक CBR150R लाँच करू शकते. कंपनीने नुकतेच पेटंट फाईल केले आहे. यात नवीन मोटरसायकल लॉन्च करण्याचे संकेत मळत आहेत. जर ही नवी मोटरसायकल देशात लाँच झाली तर बाजारात तीची टक्कर थेट Yamaha R15 V4 सोबत असेल. कंपनीने या बाईकला जबरदस्त बॉडीवर्क दिले आहे, जे एरोडायनामिक पॅनल्ससह येते. या बाईकचे डिझाईन साधारणपणे CBR सारखेच आहे.
डुअल LED हेडलॅम्प आणि LED DRLs -
या बाईकच्या पुढील भागात ड्युअल एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी डीआरएल असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय, नवीन स्पोर्ट्स बाईकच्या इतर प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये लहान विंडस्क्रीन, स्पोर्टी रीअर व्ह्यू मिरर, खालच्या बाजूस असलेले रुंद हँडल, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, जबरदस्त फ्यूल टँक आणि उत्तम प्रकारे डिझाइन केलेल्या अपस्वेप्ट एक्झॉस्टसह स्टेप-अप सीटचा समावेश आहे. बाईकला USD फ्रंट फोर्क्स देण्यात आले आहे. जे सोनेरी आहेत आणि तिच्या स्पोर्टी लुकमध्ये भर घालतात.
149 CC लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन -
सध्याच्या बाईक अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहे. जिच्यामध्ये विक्ट्री ब्लॅक रेड, होंडा रेसिंग रेड, डॉमिनेटर मॅट ब्लॅक, कँडी सायंटिलेट रेड आणि मोटोजीपी एडिशनचा समावेश आहे. मात्र, नव्या मोटरसायकलमध्ये नवीन रंग आणि वैशिष्ट्यांचे पर्याय मिळू शकतात. बाईकसोबत 149 सीसी लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन दिले जाऊ शकते. जे 16.09 बीएचपी एवढी शक्ती आणि 13.7 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनमध्ये 6-स्पीड गियरबॉक्ससह स्लिप आणि असिस्ट क्लचची सुविधा असू शकते. तसेच, हिला दोन्ही चाकांना सिंगल डिस्क ब्रेक आणि एबीएससह इमरजंसी स्टॉप सिग्नल मिळू शकतात.