Honda Cars Discount : ५० किंवा ६० हजार नाही, स्टॉक रिकामा करण्यासाठी ही कंपनी देतेय कार्सवर मोठा डिस्काऊंट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 07:03 PM2023-02-02T19:03:38+5:302023-02-02T19:04:05+5:30

एकीकडे इतर कंपन्यांनी आपल्या कारच्या किमती वाढवण्यास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे ही कंपनी आपल्या कारवर सूट देत आहे.

Honda Cars Discount Not 50 or 60 thousand rs honda cars is offering big discount on cars to clear the stock honda city wrv jazz | Honda Cars Discount : ५० किंवा ६० हजार नाही, स्टॉक रिकामा करण्यासाठी ही कंपनी देतेय कार्सवर मोठा डिस्काऊंट

Honda Cars Discount : ५० किंवा ६० हजार नाही, स्टॉक रिकामा करण्यासाठी ही कंपनी देतेय कार्सवर मोठा डिस्काऊंट

googlenewsNext

Honda Cars ने फेब्रुवारी 2023 चा डिस्काऊंट जाहीर केला आहे. कंपनीला त्यांच्या Honda Z आणि Honda City 4th Generation चा स्टॉक एप्रिल 2023 पर्यंत क्लिअर करायचा आहे. म्हणूनच डीलर्स या कार्सवर डिस्काऊंट्स देत आहेत. विशेष म्हणजे एकीकडे इतर कंपन्यांनी आपल्या कारच्या किमती वाढवण्यास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे होंडा आपल्या कारवर सूट देत आहे. कंपनी ग्राहकांना 58,000 रुपयांसोबतच 12,000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काऊंटदेखील दिला जात आहे. मात्र, या ऑफर्सचा फायदा स्टॉक क्लिअर होईपर्यंतच मिळणार आहे.

कंपनी या महिन्यात आपल्या 5 मॉडेल्सवर सूट देत आहे. यामध्ये होंडा अमेझ, होंडा जॅझ, होंडा WRV, होंडा सिटी 4th Generation आणि होंडा सिटी 5th Generation यांचा समावेश आहे. ही सवलत दोन वेगवेगळ्या प्रकारे उपलब्ध आहे. म्हणजेच कॅस, एक्सचेंज आणि कॉर्पोरेट सवलत व्यतिरिक्त, लॉयल्टी सूट स्वतंत्रपणे उपलब्ध असेल.

होंडा अमेझ - Honda आपल्या लोकप्रिय सेडान अमेझवर 38,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. यामध्ये 10,000 रुपयांचा कॅशबॅक आणि 10,000 रुपयांच्या एक्सचेंज ऑफरचा समावेश आहे. याशिवाय 6000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जाईल. त्याच वेळी, लॉयल्टी बोनस अंतर्गत 5000 रुपये रोख आणि होंडा टू होंडा 7000 रुपयांचा एक्सचेंज बोनस स्वतंत्रपणे उपलब्ध असेल.

जॅझवर डीलर्स डिस्काऊंट - होंडा आपल्या हॅचबॅक जॅझच्या स्टॉकवर 5000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. यामध्ये 5000 रुपयांच्या कॅशबॅकचा समावेश आहे. लॉयल्टी बोनस अंतर्गत 5000 रुपये रोख आणि 7000 रुपयांचे होंडा टू होंडा एक्सचेंज स्वतंत्रपणे उपलब्ध असेल. याशिवाय डीलर्सकडून या कारवर वेगळी सूट मिळू शकते.

होंडा WRV - Honda WRV स्टॉकवर कंपनी 67,000 रुपयांपर्यंत ऑफर देत आहे. यामध्ये 30,000 रुपयांचा कॅशबॅक आणि 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे. याशिवाय 5000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जाईल. त्याच वेळी, लॉयल्टी बोनस अंतर्गत 5000 रुपये रोख आणि होंडा टू होंडा 7000 रुपयांचा एक्सचेंज स्वतंत्रपणे उपलब्ध असेल.

होंडा सिटी 4th Generation - होंडा सिटी 4th Generation च्या स्टॉकवर 5000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यामध्ये 5000 रुपयांच्या कॅशबॅकचा समावेश आहे. दरम्यान, लॉयल्टी 

Web Title: Honda Cars Discount Not 50 or 60 thousand rs honda cars is offering big discount on cars to clear the stock honda city wrv jazz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.