Honda CB350 RS भारतात लाँच; पाहा किती आहे किंमत, काय आहेत फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 02:21 PM2021-02-17T14:21:27+5:302021-02-17T14:26:07+5:30
Honda CB350 RS : 350CC इजिन क्षमतेच्या सेगमेंटमध्ये ही बाईक Royal Enfield ला देणार टक्कर
Honda CB350 RS Launched: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियानं भारतात आपली सीबी रेंजचं नवं मॉडेल लाँच केलं आहे. कंपनीनं आपली नवी बाईक CB350 RS लाँच केली. या बाईकची किंमत तब्बल १.९६ लाख (एक्स शोरूम) इतकी आहे. या बाईकचं बेस व्हेरिअंट यापेक्षा १० हजार रूपयांनी स्वस्त आहे. होंडा CB350 RS ही बाईक रेड मेटलिक आणि पर्ल स्पोर्ट्स या दोन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. CB350 RS यामधील आरएसचा अर्थ हा रोड सेलिंग असा आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासातही बाईक चालवणाऱ्याला आणि त्याच्या मागे बसून प्रवास करणाऱ्यालाही आराम मिळेल अशी ही बाईक तयार करण्यात आल्याचा दावा कंपनीनं केला आहे.
CB350 RS मध्ये इंजिन आणि त्याचे अन्य पार्ट्स CB350 प्रमाणेच आहेत. CB350 RS मध्ये 348 सीसीचं इंजिन, सिंगल सिलिंडर एअर कुल्ड इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 20.8 हॉर्स पॉवर आणि 30Nm चा टॉर्क जनरेट करतो. यामध्ये 5 स्पीड ट्रान्समिशन गियरबॉक्स देण्यात आला आहे.
काय आहे विषेश?
CB350 RS मध्ये होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल देण्यात आला आहे. ही कंपनीची एक कंट्रोल सिस्टम आहे आणि ते सुरू किंवा बंदही केलं जाऊ शकतं. CB350 RS मध्ये शेप्ड एलईडी टर्न इंडिकेटर्ससोबतच Front Fork Gaiters देण्यात आले आहे. यामध्ये स्किड प्लेट आणि आणि 150/170 सेक्शन रिअर टार्सही आहेत. या बाईकच्या रिअर एन्डमध्ये काही बदल करण्यात आला आहे आणि तो CB350 पेक्षा वेगळा दिसतो. याव्यतिरिक्त CB350 RS मध्ये सीटिंग अधिक चांगलं करण्यात आलं आहे आणि त्यात टक अँड रोल डिझाईनही देण्यात आलंय.
Royal Enfiled ला टक्कर
CB350 च्या आतापर्यंत १० हजारांपेक्षा अधिक बाईक्सची विक्री झाली आहे. 350 CC इंजिन क्षमता असलेल्या सेगमेंटमध्ये Royal Enfield Meteor 350 ला Honda H’ness CB350 नं मोठी टक्कर दिली आहे. ज्या प्रकारे Honda H’ness CB350 नं उत्तम कामगिरी केली आहे त्याप्रमाणे CB350 RS चीही उत्तम विक्री होईल अशी अपेक्षा कंपनीनं व्यक्त केली आहे.