ADAS फीचर्ससह नवीन Honda City लाँच, किंमत 11.50 लाखांपेक्षा कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 05:23 PM2023-03-02T17:23:32+5:302023-03-02T17:23:55+5:30

Honda City 2023 launched with ADAS : नवीन होंडा सिटीच्या डिझाइन, फीचर्स आणि पॉवरट्रेनमध्ये बदल करण्यात आले आहेत.

Honda City 2023 launched with ADAS, new looks, new variants. Check prices | ADAS फीचर्ससह नवीन Honda City लाँच, किंमत 11.50 लाखांपेक्षा कमी

ADAS फीचर्ससह नवीन Honda City लाँच, किंमत 11.50 लाखांपेक्षा कमी

googlenewsNext

होंडाने (Honda) आपली होंडा सिटी (Honda City) कॉम्पॅक्ट सेडान भारतात नवीन अवतारात लाँच केली आहे. नवीन होंडा सिटीच्या डिझाइन, फीचर्स आणि पॉवरट्रेनमध्ये बदल करण्यात आले आहेत. ही भारतात विकल्या जाणार्‍या लोकप्रिय सेडान कारपैकी एक आहे. होंडा सिटी 2023 चार व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आली आहे, ज्यामध्ये SV, V, VX आणि ZX यांचा समावेश आहे. 

होंडाने नवीन सिटीची किंमत पेट्रोल-व्हेरिएंटसाठी 11.49 लाख रुपये ते 15.97 लाख रुपयांपर्यंत ठेवली आहे. कंपनीच्या हायब्रिड मॉडेलची (City e:HEV फेसलिफ्ट)  किंमत 18.89 लाख ते 20.39 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असणार आहे. होंडा सिटीची स्पर्धा Maruti Suzuki Ciaz आणि Hyundai Verna 2023 शी आहे. Hyundai Verna देखील 21 मार्च रोजी नवीन अवतारात लाँच होणार आहे.

कंपनीने एक्सटीरियर्स अपग्रेड केले आहेत, पण इंटीरियरमध्ये फारसा बदल झालेला नाही. हे ड्युअल-टोन थीम आणि नवीन अपहोल्स्ट्रीसह सादर केले गेले आहे. यात 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पॅनोरॅमिक सनरूफ यांसारखी फीचर्स आहेत. कंपनीने वायरलेस चार्जिंगसह वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोची सुविधाही दिली आहे.

कंपनीने नवीन होंडा सिटीमधील फीचर्सच्या बाबतीत ADAS (अॅडव्हान्स ड्राइव्हर असिस्टंट सिस्टम) च्या रूपात सर्वात मोठी भर घातली आहे. कंपनीने गेल्या वर्षी स्ट्राँग हायब्रिड व्हेरिएंटमध्ये हे फीचर्स जोडले होते. या अंतर्गत, कारला अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट आणि ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग सारख्या सुविधा मिळतात.

इंजिनबद्दल बोलायचे झाले तर 1.5-लिटर डिझेल इंजिन बंद करण्यात आले आहे. त्याच्या जागी, 1.5-लीटर पेट्रोल इंजिन दिले गेले आहे, जे आता E20 इथेनॉल-मिश्रणवर चालू शकते. हे इंजिन 121 hp पॉवर आणि 145 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. होंडा सिटी पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंटसाठी 17.8 kmpl आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंटसाठी 18.4 kmpl मायलेज देते. तर कारचे 1.5-लिटर हायब्रिड इंजिन 126 hp पॉवर आणि 256 Nm चा पीक टॉर्क देते. कारची फ्यूल इकॉनमी 27.13 kmpl आहे.

Web Title: Honda City 2023 launched with ADAS, new looks, new variants. Check prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.