भारतात बंद होणार 'या' पॉप्युलर कार? कंपनीनं दिली महत्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 12:10 PM2022-09-20T12:10:49+5:302022-09-20T12:13:33+5:30
भारतासाठी आपल्या आगामी नव्या एसयूव्हीने डेव्हलपमेन्ट फेस पार केला आहे आणि काही दिवसांतच हीचे प्रोडक्शनही सुरू होईल, असे होंडाने म्हटले आहे.
मारुती सुझुकी, वोक्सवॅगन, स्कोडा, निसान आणि रेनॉल्ट सारख्या कंपन्यांनी यापूर्वीच भारतामध्ये आपल्या डिझेल गाड्या बंद केल्या आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, आता, होंडाकार्स इंडियाही लवकरच डिझेल गाड्या बंद करण्याचा विचार करत आहे.
एका ऑनलाइन मीडिया पब्लिकेशनसोबत बोलताना होंडाकार्स इंडियाचे अध्यक्ष आणि सीईओ, ताकुया त्सुमुरा म्हणाले, कंपनी डिझेल इंजिनच्या बाबतीत आता अधिक विचार करत नाही. अधिकांश कार कंपन्यांनी युरोपातील बाजारात आपले डिझेल पॉवरट्रेन बंद केले आहेत.
होंडाच्या भारतातील पोर्टफोलिओमध्ये सध्या डिझेल पॉवरट्रेनच्या चार मॉडेल्सचा समावेश आहे. यात जॅज प्रीमियम हॅचबॅक, डब्ल्यूआर-व्ही सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही, अमेज कॉम्पॅक्ट सेडान आणि सिटी मिड-साइज सेडानचा समावेश आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार कंपनी जॅज, डब्ल्यूआरव्ही आणि सिटीचे डिझेल व्हेरिअंट बंद करू शकते. तसेच, कंपनी आपल्या विक्रीचे नेटवर्क अपग्रेड करण्याबरोबरच, एसयूव्ही मॉडेल लाइनअपच्या विस्तारावरही काम करत आहे.
भारतासाठी आपल्या आगामी नव्या एसयूव्हीने डेव्हलपमेन्ट फेस पार केला आहे आणि काही दिवसांतच हीचे प्रोडक्शनही सुरू होईल, असे होंडाने म्हटले आहे. ही मिड साइज SUV असू शकते. जी Hyundai Creta, Kia Seltos, नवी Toyota Hyryder आणि येणारी Maruti Grand Vitara ला आव्हान देईल.