पेट्रोलसोबतच इलेक्ट्रिकवरही धावणार होंडाची 'ही' कार; मायलेजही शानदार!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 01:29 PM2022-04-14T13:29:54+5:302022-04-14T13:31:05+5:30
Honda city hybrid car launch : होंडाची होंडा सेन्सिंग टेक्नॉलॉजी असणार आहे. तसेच होंडाची स्वतःची विकसित ADAS मिळेल.
नवी दिल्ली : सेडान सेगमेंटमधील देशातील सर्वाधिक लोकप्रिय कारहोंडा सिटीची (Honda City) हायब्रीड व्हर्जन e:HEV आज लॉंच होणार आहे. ही कार केवळ पेट्रोलवर चालणार नाही, तर इलेक्ट्रिक कारची अनेक फीचर्सही यात असणार आहेत. या कारशी संबंधित संपूर्ण माहिती लॉंच झाल्यानंतरच समजणार आहे.
e:HEV च्या टीझरवरून आपल्याला पहिली गोष्ट कळते की, ही कार गेल्या वर्षी आलेल्या पाचव्या पिढीच्या Honda City सारखीच असेल, त्याशिवाय e:HEV चा बॅज मागील बाजूस अपडेट केला जाईल. दुसरीकडे, कारचे दोन ट्रिम V आणि ZX येऊ शकतात. कंपनीच्या डीलर्सकडून बुकिंग घेण्यास सुरुवात केली आहे. कारची किंमत जवळपास 18 लाख रुपये असू शकते.
Honda City Hybrid मध्ये 1.5 लीटरचे N Atkinson सायकल पेट्रोल इंजिन असणार आहे. त्यासोबत दोन इलेक्ट्रिक मोटर्सही असतील. कमी वेगाने, हे वाहन पूर्णपणे इलेक्ट्रिक मोटरवर चालण्यास सक्षम असेल. तर उच्च वेगाने जाण्यासाठी इंधन म्हणून पेट्रोल वापरते. कारचे पेट्रोल इंजिन 97 bhp ची कमाल पॉवर आणि 127 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. दोन इलेक्ट्रिक मोटर्स मिळून जास्तीत जास्त 108 bhp पॉवर आणि 253 Nm पीक टॉर्क जनरेट करतात.
होंडाची होंडा सेन्सिंग टेक्नॉलॉजी असणार आहे. तसेच होंडाची स्वतःची विकसित ADAS मिळेल. यात इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन किपिंग असिस्ट, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन डिपार्चर वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, ऑटो हाय बीम असिस्ट आणि फ्रंट कोलिजन वॉर्निंग सिस्टीम यांसारखी फीचर्स देखील मिळू शकतात. दरम्यान, एकदा लॉन्च झाल्यानंतर, होंडा सिटी हायब्रीड बाजारात अनेक सेडानशी स्पर्धा करेल. यामध्ये Maruti Ciaz पासून ते Hyundai Verna, Skoda Slavia आणि Volkswagen Virtus चा समावेश आहे, ज्या काही दिवसानंतर लाँच होणार आहेत.