Honda Electric Scooter: होंडाने लाँच केली U-GO ईलेक्ट्रीक स्कूटर; दोन बॅटरी जोडल्यास 130 किमीची रेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 06:25 PM2021-08-07T18:25:25+5:302021-08-07T18:32:10+5:30

U-GO electric scooter: Honda U-GO मध्ये एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये स्पीड, डिस्टन्स, चार्ज आणि रायडिंग मोड आदी दिसणार आहे. या स्कूटरमध्ये LED हेडलाईटसोबत ट्रिपल बीम फ्रंट अॅप्रोचसह मिळणार आहे.

Honda launches U-GO electric scooter; 130 km range when two batteries are connected | Honda Electric Scooter: होंडाने लाँच केली U-GO ईलेक्ट्रीक स्कूटर; दोन बॅटरी जोडल्यास 130 किमीची रेंज

Honda Electric Scooter: होंडाने लाँच केली U-GO ईलेक्ट्रीक स्कूटर; दोन बॅटरी जोडल्यास 130 किमीची रेंज

googlenewsNext

होंडा मोटर्सने परवडणारी इलेक्ट्रीक स्कूटर U-GO लॉन्च केली आहे. कंपनीने या स्कूटरला Chinese arm Wuyang प्लॅटफॉर्मवर डेव्हलप केले आहे. याचबरोबर कंपनीने या स्कूटरचे दोन व्हर्जन आणले आहेत. यामध्ये वेगवेगळ्या पॉवरच्या बॅटरी पॅक देण्यात आले आहेत. (Honda U-GO has been launched through its Chinese arm Wuyang-Honda and will be available for Chinese market only.)

Simple One EV: 240 किमी रेंजवाली ई-स्कूटर या 13 राज्यांत मिळणार; महाराष्ट्र आहे का?

Honda U-GO इलेक्ट्रिक स्कूटर चे फीचर्स – या ईलेक्ट्रीक स्कूटरमध्ये 1.2kW  continuous hub  मोटर देण्यात आली आहे. जी 1.8kW चे आऊटपूट देते. या स्कूटरचा टॉप स्पीड हा 53 kmph आहे. तर दुसऱ्य़ा व्हर्जनमध्ये 800W  continuous hub मोटर देण्यात आली आहे. जी 1.2kW चे आऊटपूट देते. या स्कूटरचा टॉप स्पीड 43kmph आहे. 

Ola E scooter मध्ये रिव्हर्स गिअर? मागे जाणाऱ्या स्कूटरचा व्हिडीओ, त्यावर सीईओंचेही 'उलटे' संकेत

Honda U-GO च्या दोन्ही व्हर्जनमध्ये कंपनीने 48V आणि 30Ah ची रिमुव्हेबल लिथिअम आयन बॅटरी पॅक दिले आहे. जे 65 किमीची रेंज देते. या स्कूटरमध्ये अतिरिक्त बॅटरी लावून 130 किमीची रेंज मिळवता य़ेते. 

Renault 10 years celebration: यंदा घ्या, 2022 मध्ये पैसे भरा! रेनोला भारतात 10 वर्षे पूर्ण; नवी कार लाँच, भन्नाट ऑफर्स

Honda U-GO मध्ये एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये स्पीड, डिस्टन्स, चार्ज आणि रायडिंग मोड आदी दिसणार आहे. या स्कूटरमध्ये LED हेडलाईटसोबत ट्रिपल बीम फ्रंट अॅप्रोचसह मिळणार आहे. या स्कूटरला पुढे 12 इंच आणि मागे 10 इंचाचा अलॉय व्हील मिळणार आहे. या स्कूटरमध्ये 26 लीटरची बूटस्पेस मिळणार आहे. या स्कूटरची किंमत 1,150 डॉलर आहे. भारतात याची किंमत 85 हजार रुपये होते. सध्या ही स्कूटर चीनमध्ये लाँच करण्यात आली आहे. भविष्य़ात भारतात ही स्कूटर लाँच होण्याची शक्यता आहे.

Web Title: Honda launches U-GO electric scooter; 130 km range when two batteries are connected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.