Honda Activa 125 खरेदी करण्याची उत्तम संधी, कंपनीकडून स्कूटरवर शानदार ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 05:01 PM2022-02-26T17:01:57+5:302022-02-26T18:40:15+5:30
Honda Activa 125 Scooter : या ऑफरचा लाभ ग्राहकांना निवडक डेबिट कार्डद्वारे EMI वर स्कूटरच्या खरेदीवर मिळेल.
नवी दिल्ली : होंडाची अॅक्टिव्हा 125 स्कूटर घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया कंपनीने (Honda Motorcycle and Scooter India) अॅक्टिव्हा 125 (Activa 125) स्कूटरवर विशेष कॅशबॅक ऑफर दिली आहे. होंडाने जाहीर केलेल्या या ऑफरमध्ये ग्राहकांना या स्कूटरच्या खरेदीवर 5,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. दरम्यान, या ऑफरचा लाभ ग्राहकांना निवडक डेबिट कार्डद्वारे EMI वर स्कूटरच्या खरेदीवर मिळेल. कंपनी किमान 30,000 रुपयांच्या व्यवहारांवर 5 टक्के म्हणजेच 5,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक देईल.
'ही' ऑफर 31 मार्च 2022 पर्यंत
याशिवाय, होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया ग्राहकांच्या आवडत्या Activa 125 स्कूटरची ऑफर देत आहे, या स्कूटरचे सुरूवातीचे डाउन पेमेंट 3,999 रुपये आहे. तसेच, कंपनीने ही ऑफर केवळ 31 मार्च 2022 पर्यंत ग्राहकांना दिली आहे. या ऑफर डीलरशिप आणि शहरानुसार बदलू शकतात. त्यामुळे आम्ही ग्राहकांना सर्वोत्तम डीलसाठी त्यांच्या जवळच्या डीलरशी संपर्क साधण्याची शिफारस करतो. Activa 125 व्यतिरिक्त कंपनीने Activa 6G वर देखील ही ऑफर उपलब्ध करून दिली आहे.
कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर
दरम्यान, Activa 125 ला भारतीय ग्राहकांना कितपत पसंती मिळते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ही स्कूटर बऱ्याच दिवसांपासून कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. अगदी होंडा टू-व्हीलरनेही या स्कूटरच्या 1,43,234 युनिट्सची भारतात गेल्या महिन्यात विक्री केली आहे. Activa 125 मध्ये 124 सीसीचे सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन आहे. जे 6500 आरपीएमवर 8.18 बीएचपी पॉवर आणि 5000 आरपीएमवर 10.3 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. भारतीय बाजारपेठेत Activa 125 ची टक्कर Suzuki Access 125 आणि TVS Jupiter 125 शी आहे.