Honda ने आणली इलेक्ट्रिक SUV, फूल चार्जमध्ये दिल्ली-लखनौ जाऊ शकणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 06:31 PM2022-10-10T18:31:16+5:302022-10-10T18:34:00+5:30

Honda Prologue Electric SUV कार सीआर-व्ही वरील श्रेणीमध्ये ठेवण्यात आलं आहे. या कारची लांबी 4877 मिमी. रुंदी 1643 मिमी, तर 3094 मिमीचा व्हीलबेस असणार आहे. 

honda prologue electric suv comes with massive battery pack it can give 512km range in single charge | Honda ने आणली इलेक्ट्रिक SUV, फूल चार्जमध्ये दिल्ली-लखनौ जाऊ शकणार!

Honda ने आणली इलेक्ट्रिक SUV, फूल चार्जमध्ये दिल्ली-लखनौ जाऊ शकणार!

Next

होंडा कार निर्मात्या कंपनीनं आपली नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही कारचा लूक सादर केला आहे. या कारबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. कारमध्ये मोठी आणि शक्तिशाली बॅटरी बॅकअप मिळेल, जी एका चार्जमध्ये तब्बल 520 किमी पेक्षा जास्त ड्रायव्हिंग रेंज देईल. एवढं अंतर कापल्यानंतर कार दिल्लीतील अक्षरधाम ते लखनौपर्यंत जाऊ शकते. होंडाच्या आगामी कारचे नाव Honda Prologue Electric SUV कार असे असेल. 

Honda Prologue इलेक्ट्रिक SUV कारमध्ये अनेक नवीन आणि दमदार फीचर्स पाहायला मिळतात. या आगामी कारची माहिती गाडीवाडी नावाच्या वेबसाइटने शेअर केली आहे. रिपोर्ट्सनुसार, ही कार शेवरलेट ब्लेझर EV सारखी असू शकते, जी IC इंजिनपेक्षा मोठी आहे. ही कार एका चार्जमध्ये 512 किमीपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते. अशा परिस्थितीत ही कार दिल्लीतील अक्षरधाम ते लखनौ असा प्रवास करू शकते.

एमजी मोटर्सच्या सहकार्याने तयार केली कार
होंडा कंपनीने ही कार सादर केली आहे परंतु अद्याप ती विक्रीसाठी उपलब्ध केलेली नाही. ही कार होंडाने जनरल मोटर्ससोबत (MG) भागीदारी करून तयार केली आहे. ही कार अमेरिकन कार ब्रँडच्या EV प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. Honda Prologue इलेक्ट्रिक SUV चे स्पेसिफिकेशन्स अजून समोर आलेले नाहीत.

ड्रायव्हिंग रेंज किती असेल
Chevrolet Blazer EV च्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, ही कार टू व्हील ड्राइव्ह आणि फोर व्हील ड्राइव्ह पर्यायांमध्ये लॉन्च केली जाऊ शकते. ब्लेझर EV मध्ये, कंपनीने दोन पर्याय सादर केले आहेत, त्यापैकी एक 467 किमीची ड्रायव्हिंग रेंज मिळते. तर RS नावाच्या दुसऱ्या व्हेरियंटला 515 किमीची ड्रायव्हिंग रेंज मिळेल. अशीच ड्रायव्हिंग रेंज Honda Prologue मध्येही पाहायला मिळू शकते.

Honda Prologue ची लांबी आणि रुंदी
Honda Prologue इलेक्ट्रिक SUV CR-V च्याही वरच्या श्रेणीमध्ये स्थान दिलं जाऊ शकतं. या कारमध्ये 4877 मिमी लांबी दिसेल. तर 1643 मिमी रुंदी आणि 3094 मिमीचा व्हीलबेस दिसू शकतो. ही नवीन स्टाइलची कार असेल आणि दिसायला आकर्षक असेल.

Web Title: honda prologue electric suv comes with massive battery pack it can give 512km range in single charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.