पेट्रोल नव्हे, आता इथेनॉलवर चालणार Honda ची Activa; जाणून घ्या कंपनीचा प्लान...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 05:48 PM2022-05-27T17:48:24+5:302022-05-27T17:52:56+5:30

देशातील वाहन कंपन्यांनी फ्लेक्स फ्युअल तंत्रज्ञानावर गांभीर्यानं काम करावं असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं होतं.

honda two wheeler may launch flex fuel activa very soon reduce petrol bill price down | पेट्रोल नव्हे, आता इथेनॉलवर चालणार Honda ची Activa; जाणून घ्या कंपनीचा प्लान...

पेट्रोल नव्हे, आता इथेनॉलवर चालणार Honda ची Activa; जाणून घ्या कंपनीचा प्लान...

Next

नवी दिल्ली-

देशातील वाहन कंपन्यांनी फ्लेक्स फ्युअल तंत्रज्ञानावर गांभीर्यानं काम करावं असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं होतं. फ्लेक्स फ्युअल संदर्भात आता Honda Motorcycles and Scooter India (HMSI) कंपनीनं सविस्तर योजना आखली आहे. येत्या काळात Honda Activa किंवा इतर कोणत्यातरी मोटारसायकलमध्ये फ्लेक्स फ्युअल तंत्रज्ञान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच मोटारसायकल पेट्रोल ऐवजी इथेनॉल किंवा इतर कोणत्या तरी पर्यायी इंधनावर चालू शकणार आहे. 

पेट्रोलमध्ये इथेनॉलचं किती प्रमाणात मिश्रण केलं जाऊ शकतं याचा अभ्यास कंपनीकडून सुरू आहे. वाहनाची कामगिरी आणि इंजिनवर कोणताही परिणाम होणार नाही याचीही काळजी घेणं गरजेचं आहे. कंपनी गेल्या १० वर्षांपासून ब्राझीलमध्ये फ्लेक्स-इंधन तंत्रज्ञान वापरत आहे आणि तिथं बरंच यश मिळालं आहे. होंडानं आतापर्यंत ७० लाखाहून अधिक फ्लेक्स-इंधन असलेल्या टू-व्हीलरची विक्री केली आहे. 

२०२४ मध्ये लॉन्च होण्याची शक्यता
होंडा कंपनी २०२४ मध्ये भारतात फ्लेक्स-फ्युअल इंधनावर चालणारी दुचाकी लॉन्च करण्याची शक्यता आहे. यावर अद्याप काम सुरू असून सध्या कंपनीनं इलेक्ट्रीक दुचाकी आणि बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत केलं आहे. 

फ्लेक्स फ्युअलमुळे खर्च वाचणार
फ्लेक्स फ्युअल इंजिनमुळे वाहनाला एकाहून अधिक इंधन वापरण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. फ्लेक्स फ्युअल इंजिनामुळे पेट्रोलसोबतच इथेनॉल, सीएनजी, बायो-एलएनजी आणि इलेक्ट्रीक पावरचा देखील वाहनात इंधन म्हणून वापर करता येईल. याला हायब्रिड इंजिन म्हणून ओळखता येईल. 

फ्लेक्स फ्युअलवर आधारित इंजिन आलं तर लोक आपली वाहनं इथेनॉलवरही चालवू शकणार आहेत. इथेनॉलची किंमत ६५ रुपये प्रतिलीटर इतकी आहे. तर पेट्रोलची किंमत सध्या शंभरीपार आहे. एक लीटर इथेनॉल ८०० ग्राम पेट्रोलएवढं काम करते. अशापद्धतीनं जर वाहनांमध्ये फ्लेक्स फ्युअलचा पर्याय उपलब्ध झाला. तर प्रतिलीटर पेट्रोलचा खर्च २० रुपयांपर्यंत कमी होऊ शकतो. 

Web Title: honda two wheeler may launch flex fuel activa very soon reduce petrol bill price down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.