Honda Discount Offer : होंडा स्कूटर आणि बाइक्स 5 हजारांपर्यंत कॅशबॅक, झिरो डाउन पेमेंट व No Cost EMI वर करू शकता खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 12:11 PM2022-09-19T12:11:45+5:302022-09-19T12:12:32+5:30
Honda Discount Offer : कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या जाहिरातीनुसार, या सणासुदीच्या हंगामात कोणत्याही होंडा स्कूटर किंवा बाइकच्या खरेदीवर कंपनी 5 टक्के कॅशबॅक देत आहे, जे कमाल 5 हजार रुपयांपर्यंत आहे.
नवी दिल्ली : होंडा टू व्हीलर्स इंडियाने (Honda Two Wheelers India) देशात सुरू झालेल्या सणासुदीच्या हंगामात आपल्या टू-व्हीलर रेंजची विक्री वाढवण्यासाठी आकर्षक सणाच्या ऑफर्स सादर केल्या आहेत. ज्यामध्ये कंपनी सध्याच्या स्कूटर आणि बाइक्सच्या रेंजवर कॅशबॅक व्यतिरिक्त झिरो डाउन पेमेंट, नो कॉस्ट ईएमआय सारख्या आकर्षक ऑफर देत आहे.
कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या जाहिरातीनुसार, या सणासुदीच्या हंगामात कोणत्याही होंडा स्कूटर किंवा बाइकच्या खरेदीवर कंपनी 5 टक्के कॅशबॅक देत आहे, जे कमाल 5 हजार रुपयांपर्यंत आहे. यानंतर कंपनी ग्राहकांचे बजेट लक्षात घेऊन फायनान्स प्लॅन अंतर्गत खरेदी केलेल्या टू व्हीलरवर काही अटींसह झिरो डाऊन पेमेंट ऑफर करत आहे. यानंतर, कंपनीची तिसरी ऑफर नो कॉस्ट ईएमआय आहे, जी सर्व होंडा स्कूटर आणि बाइकवर लागू असणार आहे. कंपनी काही अटींसह ही नो कॉस्ट ईएमआय ऑफर करत आहे, ज्यामध्ये तुम्हाला क्रेडिट कार्डद्वारे ईएमआय जमा करावा लागेल.
या सणाच्या ऑफरमध्ये ऑफर केल्या जाणाऱ्या कॅशबॅक ऑफरसाठी कंपनीने स्टँडर्ड चार्टर्ड, फेडरल बँक, बँक ऑफ बडोदा, आयडीएफसी फर्स्ट बँक, वनकार्ड यांसारख्या आघाडीच्या बँका आणि वित्त कंपन्यांशी करार केला आहे. होंडाने जारी केलेल्या या सणाच्या ऑफरद्वारे स्कूटर किंवा बाइक खरेदी करणारे ग्राहक या ऑफरची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात किंवा या ऑफरबद्दल माहिती मिळवण्यासाठी आपल्या जवळच्या होंडा टू व्हीलर शोरूमला भेट देऊ शकतात. होंडाने जारी केलेली ही डिस्काउंट ऑफर देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये बदलू शकते.
दरम्यान, कंपनीने नुकतीच आपली सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर होंडा अॅक्टिव्हाचे (Honda Activa) प्रीमियम एडिशन लाँच केले आहे. होंडा अॅक्टिव्हा ही ऑगस्ट महिन्यात आपल्या कंपनीसह देशात सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर बनली आहे. याशिवाय, कंपनीने होंडा शाईनचे (Honda Shine) सेलिब्रेशन एडिशन देखील लाँच केले आहे. होंडा शाईन ही कंपनीच्या बाइक सेगमेंटची सर्वाधिक विक्री होणारी बाइक आहे, जी ऑगस्ट महिन्यात देशातील दुसरी सर्वाधिक विक्री होणारी बाइक बनली आहे.