Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 11:06 AM2024-11-28T11:06:31+5:302024-11-28T11:07:31+5:30

Honda ACTIVA e: बहुचर्चित टू-व्हिलर कंपनी होंडा (Honda) ची ॲक्टिव्हा इलेक्ट्रिक स्कूटर अखेर बाजारात दाखल झाली आहे.

Honda unveils ACTIVA e: and QC1 electric scooters, bookings start from Jan 1 | Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...

Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...

नवी दिल्ली : बहुचर्चित टू-व्हिलर कंपनी होंडा (Honda) ची ॲक्टिव्हा इलेक्ट्रिक स्कूटर अखेर बाजारात दाखल झाली आहे. ACTIVA e यासोबतच होंडाने आणखी एक इलेक्ट्रिक स्कूटर QC1 देखील बाजारात आणली आहे. दरम्यान, सध्या आपण Honda ACTIVA e बद्दल बोलूया, जी एक प्रीमियम ईव्ही आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची खास गोष्ट म्हणजे यामध्ये बसवण्यात आलेली बॅटरीही बाहेर काढता येते. Honda ACTIVA e ची झलक समोर येताच, हे स्पष्ट झाले आहे की, यात 1.5 kWh च्या ड्युअल स्वॅप बॅटरी असतील. 

ही बॅटरी एका चार्जमध्ये एकूण 102 किमीची रेंज देईल. या बॅटरी Honda च्या पॉवर पॅक एक्सचेंजर बॅटरी स्वॅपिंग स्टेशनवर बदलल्या जाऊ शकतात. सध्या कंपनीने बंगळुरूमध्ये अशी 83 स्टेशन्स बसवली आहेत. तर 2026 पर्यंत, बंगळुरूमध्ये अशी सुमारे 250 स्टेशन्स असतील, जी तुम्हाला प्रत्येक 5 किमी रेडियसमध्ये बॅटरी बदलण्याचा पर्याय देईल. कंपनी दिल्ली आणि मुंबईत हेच काम सुरू करणार आहे.

कंपनीने ACTIVA e ला Standard आणि RoadSync Duo, अशा दोन प्रकारात लॉन्च केले आहे. यापैकी Standard व्हेरिएंटचे वजन 118 किलो तर RoadSync Duo व्हेरिएंटचे वजन 119 किलो असेल. या इलेक्ट्रिक स्कूटरचा ग्राउंड क्लीयरन्स 171 मिमी आहे. या स्कूटरमध्ये 160 मिमी फ्रंट डिस्क ब्रेक आणि 130 मिमी रिअर  ड्रम ब्रेक वापरण्यात आला आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची व्हील्स 12-इंचाची आहेत.

तुम्ही ॲक्टिव्हा इलेक्ट्रिक कधी बुक करू शकता?
ॲक्टिव्हा इलेक्ट्रिकमध्ये तीन रायडिंग मोड्स देण्यात आले आहेत. ही स्कूटर इको, स्टँडर्ड आणि स्पोर्ट मोडमध्ये चालवता येते. त्याच्या बेस व्हेरिएंटमध्ये 5-इंचाचा TFT डिस्प्ले आहे, ज्यासोबत ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीची मर्यादित फंक्शन्स दिली आहेत. तर त्याच्या टॉप व्हेरिएंट RoadSync Duo मध्ये 7-इंचाचा डॅशबोर्ड आहे, ज्यामध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि नोटिफिकेशन अलर्टचे फीचर आहे. या स्कूटरची प्री-बुकिंग 1 जानेवारी 2025 पासून सुरू होईल आणि या स्कूटरची डिलिव्हरी फेब्रुवारीपासून सुरू होईल.

Web Title: Honda unveils ACTIVA e: and QC1 electric scooters, bookings start from Jan 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.