Honda H'ness CB: होंडा भारतात ८ ऑगस्टला धमाका करणार, दणकट H'ness बाइक येणार; पाहा लूक्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 08:04 PM2022-07-20T20:04:40+5:302022-07-20T20:06:17+5:30

होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया पुढील महिन्यात नवीन मोटरसायकल लाँच करणार आहे. ही प्रीमियम दर्जाची मोटरसायकल असेल.

honda will be launched new motorcycle in india off road bike | Honda H'ness CB: होंडा भारतात ८ ऑगस्टला धमाका करणार, दणकट H'ness बाइक येणार; पाहा लूक्स...

Honda H'ness CB: होंडा भारतात ८ ऑगस्टला धमाका करणार, दणकट H'ness बाइक येणार; पाहा लूक्स...

googlenewsNext

होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया पुढील महिन्यात नवीन मोटरसायकल लाँच करणार आहे. ही प्रीमियम दर्जाची मोटरसायकल असेल. ही बाईक 8 ऑगस्टला भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. ही एक मिडलवेट बाईक असेल आणि नवीन मोटरसायकल होंडाच्या बिग विंग प्रीमियम चेन डीलरशिपद्वारे विकली जाईल. सध्या कंपनीने या उत्पादनाविषयी कोणतीही माहिती शेअर केलेली नाही, परंतु कंपनीने 8 ऑगस्ट रोजी लॉन्च सोहळ्याचं निमंत्रण शेअर केलं आहे.

ही मध्यम क्षमतेची सेगमेंट बाइक असू शकते. यामध्ये 500 सीसीचे इंजिन दिसू शकते. सेगमेंट क्रूझर सेगमेंटमधील ही H'ness 350 सीरिजची मोटरसायकल असू शकते. अलीकडेच Honda CRF 300L भारतात दिसली आहे. पण आतापर्यंत कंपनीने अधिकृतपणे अशी कोणतीही माहिती दिलेली नाही. 

ही असेल होंडाची ऑफ रोड बाईक
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार, Honda आता ऑफ-रोड बाइक्स लाँच करण्याचा विचार करत आहे. ज्यांना CRF 300L आणि CRF 500L असे नाव दिले जाऊ शकते. या मोटारसायकली केटीएम अॅडव्हेंचर सीरिजशी स्पर्धा करतील.

होंडाच्या आगामी बाइकमध्ये 286 सीसी इंजिन?
वेबसाइट जिगव्हील्सने आपल्या एका रिपोर्टमध्ये सांगितले आहे की 8 ऑगस्ट रोजी लॉन्च होणार्‍या मोटरसायकलचे नाव CRF 300L असू शकते. या मोटरसायकलच्या संभाव्य वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये 286 सीसी सिंगल सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजिन दिले जाऊ शकते, जे 27.33 PS पॉवर आणि 26.6 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. पण या आगामी मोटरसायकलबद्दल बरेच तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.

Honda ने आपली Honda CBR 150R Repsol मलेशियामध्ये सादर केली आहे. ही मोटारसायकल नुकतीच मलेशियामध्ये सादर करण्यात आली असून लवकरच ती इतर देशांमध्येही सादर केली जाईल. कंपनीने ही मोटरसायकल ऑरेंज कलर व्हेरियंटमध्ये सादर केली आहे.

Web Title: honda will be launched new motorcycle in india off road bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.