Honda नवी कॉम्पॅक्ट SUV लाँच करणार, टाटा नेक्सॉन आणि मारुती ब्रेझाला टक्कर देणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 05:45 PM2022-07-30T17:45:19+5:302022-07-30T17:45:59+5:30
जपानी वाहन निर्माता कंपनी Honda पुढील वर्षी भारतीय बाजारपेठेत नवीन कॉम्पॅक्ट SUV लाँच करण्याच्या तयारीत आहे.
जपानी वाहन निर्माता कंपनी Honda पुढील वर्षी भारतीय बाजारपेठेत नवीन कॉम्पॅक्ट SUV लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्याच वेळी, कंपनीने Honda Jazz, Honda WR-V आणि Honda City फोर्थ जनरेशनचे उत्पादन बंद केल्याचेही वृत्त आहे. Honda ने आधीच Honda Civic आणि Honda CRV बंद केलं आहे. अशा परिस्थितीत, नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही होंडाची लाइनअप मजबूत करण्यासाठी काम करेल. भारतीय बाजारपेठेत चार मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये जबरदस्त स्पर्धा आहे. लॉन्च झाल्यानंतर होंडाच्या आगामी एसयूव्हीची थेट स्पर्धा टाटा नेक्सॉन, मारुती ब्रेझा, निसान मॅग्नाइट या एसयूव्हीशी असणार आहे. कंपनी Honda Amaze sedan च्या प्लॅटफॉर्मवर नवीन SUV तयार करू शकते.
असं असेल SUV चं नवं डिझाइन
होंडा कंपनी नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही राजस्थानमधील तपुकारा प्लांटमध्ये तयार करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, आगामी एसयूव्हीचे डिझाइन होंडाच्या एसयूव्ही BR-V वरून प्रेरित असू शकते. दुसरीकडे, विद्यमान प्रतिस्पर्धी कंपन्यांप्रमाणे होंडा देखील भारतात बनवलेल्या कार विदेशात निर्यात करू शकते. बंद झालेल्या W-RV च्या जागी आगामी SUV बाजारात आणली जाईल.
आगामी SUV चे स्पेसिफिकेशन्स
रिपोर्ट्सनुसार, आगामी एसयूव्ही होंडा अमेझच्या आर्किटेक्चरवर विकसित केली जाऊ शकते. त्याच वेळी, नव्या SUV चे पॉवरट्रेन पर्याय देखील Honda Amaze सारखेच असण्याची अपेक्षा आहे. Honda Amaze sedan ला 1.2-liter i-VTEC चार-सिलेंडर पेट्रोल आणि 1.5-लीटर i-DTEC चार-सिलेंडर डिझेल इंजिनमधून पॉवर मिळते. दोन्ही इंजिन चांगले मायलेज देण्यासाठी ओळखले जातात.
नवीन मध्यम आकाराची एसयूव्ही
Honda Amaze सारख्या पॉवरट्रेन व्यतिरिक्त, नवीन SUV मध्ये हायब्रिड तंत्रज्ञान देखील मिळू शकते, ज्यामुळे इंधनाचा वापर कमी होईल. त्याच वेळी, होंडाच्या नवीन कारला देखील CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळण्याची अपेक्षा आहे. आगामी SUV मध्ये सर्व नवीनतम कनेक्टिव्हिटी, सुरक्षा, मनोरंजन आणि उपयुक्तता आधारित वैशिष्ट्ये मिळतील. गाडीवाडीच्या मते, होंडा नवीन मध्यम आकाराच्या एसयूव्हीवर देखील काम करत आहे.