ह्युंदाई व्हेन्यू, Brezza ला टक्कर देणार; आली होंडाची नवी एसयुव्ही...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 04:18 PM2022-11-02T16:18:25+5:302022-11-02T16:21:18+5:30
होंडाच्या सध्याच्या कारपेक्षा मोठी, बुट स्पेसही वाढविली.
होंडा मोटर्सने आज नव्या पीढीची WR-V सब-कॉम्पॅक्ट SUV वरून पडदा हटविला आहे. जपानी कार निर्माता कंपनीने इंडोनेशियाच्या बाजारात ही एसयुव्ही नव्य़ा रुपात लाँच केली आहे. भारतात सध्याचे मॉडेलही या फेसलिफ्टने बदलण्यात येणार आहे. सध्याच्या WR-V पेक्षा ही नवी कार मोठी आहेच तसेच कनेक्टे़ड कार टेक्नॉलॉजी आणि अॅडव्हान्स सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत.
नव्या डब्ल्यूआरव्हीमध्ये रिमोट फंक्शनिंगदेखील मिळणार आहे. चावीशिवाय कार लॉक, अनलॉक करता येणार आहे. कारला रिमोटने सुरु करण्याबरोबरच ऑटो कुलिंग फंक्शनदेखील चालू करता येते. होंडा ही कार भारतातदेखील लाँच करण्याची संधी शोधत आहे. यानंतर ही कार सब कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमध्ये ब्रेझा, टाटा नेक्सॉन, ह्य़ुंदाई व्हेन्यूला टक्कर देणार आहे.
होंडा डब्ल्यूआरव्हीच्या नव्या मॉडेलमध्ये स्लिम हेडलाईट्सने घेरलेली एक बोल्ड लुकिंग ग्रील मिळणार आहे. ही एसयुव्ही आधीपेक्षा लांबीला, उंचीला आणि रुंदीला वाढविण्यात आली आहे. भारतातील WR-V पेक्षा 60 मिमी लांब, 46 मिमी रुंद आणि ७ मिमी उंचीला जास्त आहे. या कारला 220 एमएमचा ग्राउंड क्लिअरन्सदेखील आहे. या कारमध्ये १६ आणि १७ इंचाचे अलॉय व्हील दिले जाणार आहेत.
WR-Vच्या इंटेरिअरमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. सेंटर कन्सोलमध्ये डिजिटल इंफोटेनमेंट स्क्रीन आणि सेमी-डिजिटल TFT ड्रायव्हर डिस्प्ले मिळतो. याची साईज ४.२ इंच आहे. बुट स्पेसदेखील वाढवून 380 लीटर करण्यात आली आहे. मागच्या स्प्लीट सीटमुळे हे शक्य झाले आहे.