Creta-Seltos ला पछाडण्यासाठी येतेय Honda ची नवी SUV; 10 लाख रुपयांपेक्षाही कमी असेल किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 04:20 PM2022-12-31T16:20:48+5:302022-12-31T16:21:53+5:30
आता माध्यमांतील वृत्तांमध्ये दावा केला जात आहे की, होंडा भारतात एत कॉम्पॅक्ट एसयूव्ही लॉन्च करू शकते. हे सेगमेंट वेगाने वाढत आहे. या सेगमेंटमध्ये दर महिन्याला 35,000 हून अधिक युनिट्सची विक्री होत आहे.
सध्या होंडा कार भारतीय बाजारात एका मोठ्या यशाच्या शोधात आहे. कार विक्रीच्या बाबतीत कंपनीला फारशी चांगली ग्रोथ मिळालेली नाही. महत्वाचे म्हणजे होंडाच्या CR-V आणि Civic सारख्या गाड्यांनाही फारशी कमाल दाखवता आलेली नाही. कंपनीची मदार सध्या सिटी आणि अमेझ सारख्या सेडान कारवरच टिकून आहे. एप्रिल 2023 मध्ये लागू होणाऱ्या RDE (रियल ड्रायव्हिंग एमिशन) नियमांच्या पारश्वभूमीवर Jazz, WR-V आणि चौथ्या जेनरेशनची City सारख्या कारही बंद होतील. यानंतर कंपनीच्या पोर्टफोलियोमध्ये केवळ दोनच कार शिल्लक राहतील.
आता माध्यमांतील वृत्तांमध्ये दावा केला जात आहे की, होंडा भारतात एत कॉम्पॅक्ट एसयूव्ही लॉन्च करू शकते. हे सेगमेंट वेगाने वाढत आहे. या सेगमेंटमध्ये दर महिन्याला 35,000 हून अधिक युनिट्सची विक्री होत आहे. सध्या ह्युंदाई क्रेटा आणि किआ सेल्टोस या सेगमेंटमधील बेस्ट-सेलिंग कार आहेत. होंडा याच सेग्मेंटमध्ये एंट्री करण्याच्या तयारीत आहे. अद्याप पर्यंत Honda ची नवी कॉम्पॅक्ट SUV भारतात एकदाही टेस्टिंग दरम्यान दिसून आलेली नाही. महत्वाचे म्हणजे, कंपनीने भारताबाहेरच कारची टेस्टिंग सुरू केली अल्याचे शक्यता वर्तवण्यात येत आहे.
फीचर्स आणि किंमत -
होंडाची ही एसयूव्ही दोन पॉवरट्रेन ऑप्शनसह भारतीय बाजारात उतरवली जाऊ शकते. पहिले म्हणजे, 1.5L iVTEC पेट्रोल इंजिन, जे Hona City तही मिळते. दुसरे म्हणजे, 1.5 लीटर स्ट्रॉन्ग हायब्रिड युनिट, जे City e:HEV मध्ये येते. जर होंडा एसयूव्हीला हायब्रिड पर्याय मिळाला, तर ही थेट ग्रँड व्हिटारा आणि टोयोटा हायरायडरला टक्कर देईल. कंपनी यात ADAS चे फीचरही देत आहे.
याशिवाय, या कारमध्ये व्हेंटिलेटेड सीट्स, पॅनोरमिक सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, मेमरी फंक्शनसह ऑटोमॅटिक सीट्स मिळू शकतात. ही कारची लांबी 4,300mm असेल. तर हिची सुरुवातीची किंमत 10-11 लाख रुपयांपर्यंत असू शकते.