Maruti-Hyundai दोन्हीही अवाक, Honda च्या या SUV ने हादरवून टाकला संपूर्ण कार बाजार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 05:56 PM2023-01-16T17:56:28+5:302023-01-16T17:57:35+5:30

जर ही SUV यशस्वी झाली, तर क्रेटा आणि ग्रँड विटाराच्या विक्रीवर थेट परिणाम होऊ शकतो. हे ना Hyundai ला आवडणारे असेल, ना मारुतीला.

Honda's SUV has shaken the entire car market upcoming honda suv to rival hyundai creta and maruti grand vitara | Maruti-Hyundai दोन्हीही अवाक, Honda च्या या SUV ने हादरवून टाकला संपूर्ण कार बाजार!

Maruti-Hyundai दोन्हीही अवाक, Honda च्या या SUV ने हादरवून टाकला संपूर्ण कार बाजार!

Next

जपानी कार निर्माता कंपनी Honda लवकरच भारतात नवी SUV लाँच करणार आहे. ही स्थानिक पद्धतीने विकसित केली जात आहे. कंपनीने नुकताच अपकमिंग मिड साईज एसयूव्हीचा टीझर रिलीज केला आहे. तिची स्पर्धा Hyundai Creta, Maruti Suzuki Grand Vitara आणि Kia Seltos सारख्या SUV सोबत असेल.

जर ही SUV यशस्वी झाली, तर क्रेटा आणि ग्रँड विटाराच्या विक्रीवर थेट परिणाम होऊ शकतो. हे ना Hyundai ला आवडणारे असेल, ना मारुतीला. महत्वाचे म्हणजे, अद्याप लॉन्चच टायमिंगचा खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, ही नवीन Honda SUV 2023 च्या सणासुदीच्या हंगामापर्यंत (दिवाळीपूर्वी) बाजारात येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

नवी होंडा एसयूव्ही एप्रिल-मेच्या आसपास डेब्यू करू शकते. मात्र बुकिंग या महिन्याच्या माध्यात (जून, जुलैच्या जवळपास) सुरू होऊ शकते. ही कार पेट्रोल सोबतच हायब्रिड पॉवरट्रेनमध्येही आणली जाईल. पेट्रोल व्हर्जनच्या या एसयूव्हीची किंमत 10.5 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. तर स्ट्राँग हायब्रिड मॉडेलची किंमत 18 लाख रुपयांपासून ते 22 लाख रुपयांच्या जवळपास असण्याची शक्यता आहे. हिला होंडा एलिव्हेटही (Honda Elevate) म्हटले आहे. खरे तर कंपनीने 2021 मध्येत या नावाची नोंदणी केली होती.

या नव्या होंडा एसयूव्हीमध्ये कॅमेरा-बेस्ड ADAS देखील दिले जाऊ शकते. जे अद्यात ह्युंदाई क्रेटा, मारुती ग्रँड विटारा आणि किआ सेल्टॉसपैकी कशातही दिसत नाहीत. कंपनीच्या ADAS तंत्रज्ञानाला 'होंडा सेंसिंग' म्हटले जाते. यात ऑटो ब्रेकिंग, रोड डिपार्चर मिटिगेशन, लेन कीप असिस्ट, अडेप्टिव्ह क्रूज कंट्रोल आणि हाय-बीम असिस्ट सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. या कारमध्ये 6 एअरबॅग, EBD सह ABS, ESC, VSM, हिल लॉन्च असिस्ट, 360 डिग्री सराउंड व्ह्यू सिस्टिम, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक सारखे फीचर्सदेखील असण्याची शक्यता आहे.

महत्वाचे म्हणजे, या कारमध्ये 1.5-लीटर i-VTEC पेट्रोल इंजिन आणि 1.5-लीटर एटकिंसन सायकल इंजिनचे (हायब्रिड) ऑप्शन मिळू शकते. तसेच ट्रान्समिशनसंदर्भात बोलायचे झाल्यास, या कारमध्ये नॉन हायब्रिड व्हर्जनमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक युनिटचे ऑप्शन मिळू शकते. याशिवाय सिटी हायब्रिड प्रमाणे, एसयूव्ही सिंगल, फिक्स्ड-गिअर रेशियोसोबत तीन ड्राईव मोड्स- इंजिन, ईव्ही आणि हायब्रिडमध्येयेईल.

Web Title: Honda's SUV has shaken the entire car market upcoming honda suv to rival hyundai creta and maruti grand vitara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.