लय भारी! लॉन्च झाली स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रिक स्कूटर, 120Km रेंज आणि खर्च फक्त २० पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 07:40 PM2023-01-18T19:40:05+5:302023-01-18T19:42:21+5:30
इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेग्मेंटमध्ये आज एका नव्या प्लेअरची एन्ट्री झाली आहे. जयपूर स्थित इलेक्ट्रिक टू-व्हिलर वाहन निर्माती कंपनी Hop Electric नं आज बाजारात आपली नवी हायस्पीड स्कूटर Hop Leo अधिकृतरित्या लॉन्च केली आहे.
नवी दिल्ली-
इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेग्मेंटमध्ये आज एका नव्या प्लेअरची एन्ट्री झाली आहे. जयपूर स्थित इलेक्ट्रिक टू-व्हिलर वाहन निर्माती कंपनी Hop Electric नं आज बाजारात आपली नवी हायस्पीड स्कूटर Hop Leo अधिकृतरित्या लॉन्च केली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार या इलेक्ट्रीक स्कूटरची किंमत १ लाख रुपयांपेक्षा कमी असणार आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि एक्सपीरिअन्स सेंटरच्या माध्यमातून ही स्कूटर बूक करता येणार आहे. स्कूटर पाच आकर्षक रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे.
Hop Leo स्कूटरमध्ये कंपनीनं 2.1kWh क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. जी 2.95 bhp पावर आणि 90Nm पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीच्या दाव्यानुसार ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये १२० किमी इतकी रेंज देते. यासोबतच 850W चा स्मार्ट चार्जर देण्यात आला आहे. जो या स्कूटरची बॅटरी अवघ्या अडीच तासात ८० टक्क्यांपर्यंत चार्ज करू शकतो.
हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये चार रायडिंग मोड्स देण्यात आले आहेत. यात इको, पावर, स्पोर्ट आणि रिव्हर्स मोडचा समावेश आहे. सस्पेंशन बाबत बोलायचं झालं तर स्कूटरच्या फ्रंटमध्ये टेलोस्कोपिक फॉर्क आणि मागच्या बाजूला हायड्रोलिक स्प्रिंग-लोडेड ऑब्जर्व्हर सस्पेंशन देण्यात आले आहेत. याशिवाय यात डिस्क ब्रेकसोबतच कॉम्बी ब्रेकिंग सिस्टमचा देखील समावेश आहे. 160mm ग्राऊंड क्लिअरन्ससह येणारी या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये LCD डिजिटल डिस्प्ले आणि थर्ड पार्टी GPS ट्रॅकरची देखील सुविधा देण्यात आली आहे.
अवघा २० पैसे प्रतिकिमी खर्च
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीनं स्टोरेजची देखील पूर्ण काळजी घेतली आहे. सीटच्या खाली १९.५ लीटर क्षमतेचा बूट-स्पेस देण्यात आला आहे. स्कूटरची टॉप स्पीड ५३ किमी प्रतितास इतकी आहे. कंपनीच्या दाव्यानुसार एका किमीसाठी अवघ्या २० पैशांचा खर्च येतो. स्कूटरचं वजन ८० किलो असून इको मोडमध्ये ही स्कूटर 30Kmph, पावर मोडमध्ये 40Kmph आणि स्पोर्ट मोडमध्ये 52Kmph ची टॉप स्पीड मिळते.