आता थेट 300KM रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, मिळणार क्रूझ कंट्रोल सारखे जबरदस्त फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 04:25 PM2022-05-04T16:25:08+5:302022-05-04T16:25:46+5:30
या स्कूटरमध्ये अनेक बदल केले असून. आता ही स्कूटर तब्बल 300 किमीची रेंज देत आहे...
चीनमधील इलेक्ट्रिक व्हेइकल ब्रँड हॉर्विनने (horwin) अपल्या SK3 इलेक्ट्रिक स्कूटरची 2022 अॅडिशन लॉन्च केली आहे. ही स्कूटर तब्बल 300 किलोमीटर एवढी जबरदस्त रेंज देते. SK3 चे यापूर्वीचे मॉडेल गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आले होते. ते मॉडेल केवळ 80 किमीचीच रेंज देत होते.
हॉर्विनने या स्कूटरमध्ये अनेक बदल केले असून. आता ही स्कूटर तब्बल 300 किमीची रेंज देत आहे. ही रेंज दोन बॅटरीजचा एकसाथ वापर करून मिळविली जाऊ शकते. सिंगल बॅटरीवर ही स्कूटर 160 किमीपर्यंतची रेंज देते. ही रेंजदेखील, सध्या भारतात उपलब्ध असलेल्या अनेक इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सच्या तुलनेत अधिक आहे.
असे आहेत फीचर्स -
हॉर्विन SK3 ची टॉप स्पीड 90kmph एवढी आहे. हिच्यासाठी 6.3kW क्षमतेची मोटर वापरण्यात आली आहे, जी 6.3kW पॉवर आउटपुट देते. फीचर्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, या स्कूटरमध्ये फुल टीएफटी डिस्प्ले, ब्ल्युटुथ कनेक्टिव्हिटी, कीलेस पॉवर सिस्टम आणि क्रूझ कंट्रोल देण्यात आले आहे. चीन शिवाय, हॉर्विन युरोपातही SK3 इलेक्ट्रिक स्कूटर विकते. मात्र, ही स्कूटर सध्या भारतात येण्याची शक्यता कमी आहे.