E-Scooter Mileage TIPS: इलेक्ट्रीक स्कूटरची रेंज कशी वाढवाल? ही काळजी घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 04:35 PM2021-02-03T16:35:34+5:302021-02-03T16:43:43+5:30
electric scooters tips : कमी खर्चात जास्त अंतर कापण्यासाठी या स्कूटर उपयोगी ठरू लागल्या आहेत. अनेकजण असे आहेत ज्यांच्याकडे इलेक्ट्रीक स्कूटर आहे परंतू कंपनीने केलेल्या दाव्यानुसार रेंज देत नाही.
भारतात इलेक्ट्रीक स्कूटरला आता मागणी वाढू लागली आहे. यामागे परवडणाऱ्या बाईक असल्याचे मुख्य कारण आहे. पेट्रोलच्या किंमती वाढू लागल्या आहेत. यामुळे सामान्यांना रोजचा प्रवास आपल्याच वाहनाने करायचा असल्याने स्कूटरही हळूहळू परवडेनाशी झाली आहे. स्कूटरला 45 ते 55 चे खरे मायलेज मिळतेय. यामुळे छोट्या छोट्या शहरांतही आता इलेक्ट्रीक स्कूटर दिसू लागल्या आहेत.
कमी खर्चात जास्त अंतर कापण्यासाठी या स्कूटर उपयोगी ठरू लागल्या आहेत. अनेकजण असे आहेत ज्यांच्याकडे इलेक्ट्रीक स्कूटर आहे परंतू कंपनीने केलेल्या दाव्यानुसार रेंज देत नाही. यामुळे ही स्कूटर रेंजच्या निम्म्याहून अधिक अंतर कापल्यावर बंद पडते. जर ही स्कूटरची बॅटरी लवकर संपत असेल तर त्यात काही तांत्रिक बिघाड असतोच असे नाही.तुम्ही काही टिप्स फॉलो करून स्कूटरची रेंज 10 ते 20 टक्के वाढवू शकता.
कारचे अॅव्हरेज कमी झालेय का? या ट्रिक फॉलो करा, 10 टक्के जास्त मिळवा...
इकॉनॉमी मोड -
कोणत्याही इलेक्ट्रीक स्कूटरला इकॉनॉमी मोडवर चालविणे गरजेचे असते. हे अशासाठी कारण इकॉनॉमी मोडमध्ये बॅटरी कमी वापरली जाते. यामुळे तुम्ही 5 ते 10 किमीची रेंज वाढवू शकता.
FASTag खरेदी करायचाय? जाणून घ्या मनातील समज गैरसमज...
डीप डिस्चार्ज -
अनेकजण स्कूटर तेव्हाच बंद करतात जेव्हा बॅटरी पूर्ण संपते. याला डीप डिस्चार्ज म्हणतात. मोबाईल बाबतही तसेच आहे. सारखी सारखी बॅटरी चार्ज करायची नाही अन् बॅटरी मोबाईल बंद होईपर्यंत संपू द्यायची नाही. यामुळे बॅटरीवर परिणाम होऊ लागतो. खूपदा असे केल्यास स्कूटरची बॅटरी अचानक तापू लागते. यामुळे बॅटरीचे आयुष्य कमी होते. यामुळे नेहमी 20 टक्के बॅटरी उरलेली असेल तेव्हा ती चार्जिंग करावी.
इलेक्ट्रीक वाहन घेण्याचे फायदेच अधिक; तोटे फक्त २...जाणून घ्या...
सहप्रवासी
इलेक्ट्रीक स्कूटरची रेंज जर वाढवायची असेल तर तुमच्या स्कूटरवर दुसरा व्यक्ती मागे बसलेला असता नये. असे झाल्यास त्याचे वजन वाढून वीज जास्त खर्च होते. मोटरवर लोड वाढतो आणि बॅटरी लवकर डिस्चार्ज होते.
महिंद्रांनी फेकला हुकमी 'पत्ता'; XUV300 पेट्रोल AutoSHIFT लाँच, 40 हून अधिक कनेक्टेड फिचर
वातावरण -
जर तुम्हाला इलेक्ट्रीक स्कुटरची रेंज चांगली वाढवायची असेल किंवा रेंज जास्त मिळावी असे वाटत असेल तर हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळ्यात तुम्हाला स्कूटरची काळजी घ्यावीच लागेल. खूप थंडी किंवा खूप उष्णता असेल तर स्कूटरच्या बॅटरीवर परिणाम होऊ लागतो. उन्हात स्कूटर उभी केली तर बॅटरीचे तापमान वाढू शकते.