FASTag रिचार्जचे टेन्शनच गेले; कोणतीही कंपनी असो, Google Pay, Bhim मध्ये हे बदल करा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 06:01 PM2021-02-16T18:01:42+5:302021-02-16T18:05:18+5:30

How to Recharge Fastag? google Pay, Bhim App : नितीन गडकरींच्या मंत्रालयाच्या दाव्यानुसार फास्टॅग प्रणालीमुळे वाहनचालकांचा वेळ वाचणार आहे. टोल नाक्यावरील प्रत्यक्ष परिस्थिती काही वेगळंच सांगत असली तरीही त्यांच्या दाव्यानुसार ते खरे आहे. कारण तुमची तक्रारदेखील कोणी तिथे ऐकून घ्यायला तयार नसते.

How to recharge FASTag on Google Pay, Bhim app; follow step by step | FASTag रिचार्जचे टेन्शनच गेले; कोणतीही कंपनी असो, Google Pay, Bhim मध्ये हे बदल करा...

FASTag रिचार्जचे टेन्शनच गेले; कोणतीही कंपनी असो, Google Pay, Bhim मध्ये हे बदल करा...

googlenewsNext

आजपासून देशात फास्टॅग (Fastag) सक्तीचा झाला. कोणत्या कंपनीचा घेणार? रिचार्ज कसे करणार आदी कटकट याआधी मागे लागली होती. आता ही कटकट कायमची निघून जाणार आहे. टोल नाक्यावर फास्ट येणे-जाण्याचे माहिती नाही, परंतू तुमचा फास्टॅग आता फास्टमध्ये रिचार्ज करता येणार आहे. (How to Recharge Fastag? google Pay, Bhim App)

FASTag खरेदी करायचाय? जाणून घ्या मनातील समज गैरसमज...


नितीन गडकरींच्या मंत्रालयाच्या दाव्यानुसार फास्टॅग प्रणालीमुळे वाहनचालकांचा वेळ वाचणार आहे. टोल नाक्यावरील प्रत्यक्ष परिस्थिती काही वेगळंच सांगत असली तरीही त्यांच्या दाव्यानुसार ते खरे आहे. कारण तुमची तक्रारदेखील कोणी तिथे ऐकून घ्यायला तयार नसते. याचा अनुभव अनेकांना आला आहे आणि यापुढेही येणार आहे. यामुळे आता तुम्हीच फास्टॅग कसा वापरायचा आणि कसा रिचार्ज करायचा याची माहिती घेऊन सज्ञान बनने गरजेचे बनले आहे. 


अनेक बँका फास्टॅग सुविधा देत आहेत. परंतू आता हे फास्टॅग गुगल पे किंवा भीम अॅपद्वारे रिचार्ज करता येणार आहेत. (भीम अॅपद्वारे रिचार्ज करायचे असेल तर इथे क्लिक करा...)


एक महत्वाचे लक्षात घ्यायला हवे, जरी तुमच्या फास्टॅगमध्ये पुरेशी रक्कम नसेल तरीही तुम्ही पुढे प्रवास करू शकणार आहात. सरकारने झीरो बॅलन्सवरदेखील प्रवास करण्याची सूट दिली आहे. आता फास्टॅग झटपट कसा रिचार्ज करावा हे पाहू....

IMP बातमी! FASTag नसेल तर थर्ड पार्टी विमाही मिळणार नाही; केंद्राचा मोठा नियम बदल


गुगल प्लेवर कसे रिचार्ज कराल? 

 

  • सर्वात पहिल्यांदा गुगल प्ले म्हणजेच आताचे Gpay अॅप ओपन करा. 
  • यानंतर न्यू वर टॅप करा. 
  • Suggested businesses मध्ये जाऊन More वर क्लिक करा. 
  • जर फास्टॅग असे नसेल तर पुन्हा More वर क्लिक करा. 
  • यानंतर फास्टॅग आणि Get Started वर क्लिक करा. 
  • गुगल अॅपवर में ICICI, HDFC आणि AXIS बँकेच्या फास्टॅगना रजिस्टर करता येते. अन्य फास्टॅगसाठी BHIM App आहे. 
  • यापैकी एक तुमची असलेली बँक निवडून फास्टॅग रजिस्टर करा. यामध्ये तुमचा गाडी नंबर टाका. 
  • यानंतर तुम्ही फास्टॅग कधीही रिचार्ज करू शकणार आहात. 

Web Title: How to recharge FASTag on Google Pay, Bhim app; follow step by step

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.