सहा एअरबॅग तरी किया कॅरेन्स किती सुरक्षित; ग्लोबल एनकॅपमध्ये मिळाले तीन स्टार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 11:29 AM2022-06-24T11:29:12+5:302022-06-24T11:29:31+5:30
कियाने मोठा निर्णय घेतला आहे. किया यापुढे काही दिवस, महिने जेवढ्या गाड्या बनवेल त्यांची एकच चावी ग्राहकांना देणार आहे.
किया इंडियाने भारतात यंदा आपली चौथी कार लाँच केली. ही कार सात सीटर आहे. KIA Carens ही फेब्रुवारीमध्ये परवडणाऱ्या किंमतीत लाँच करण्यात आली होती. आता ही किया कॅरेन्स किती सेफ आहे याची माहिती समोर आली आहे.
किया कॅरेन्सला ग्लोबल एनकॅपमध्ये व्हेईकल क्रॅश टेस्टमध्ये तीन स्टार रेटिंग मिळाली आहे. यामुळे ही कार एवढी सुरक्षित असल्याचे दिसून आलेले नाही. किया कॅरेन्सला भारतात लाँच होताच मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. दोन महिन्यांताच ५० हजारहून अधिक बुकिंग मिळाल्या होत्या. किया इंडियाने एक यादी जारी केली आहे, यामध्ये किया कॅरेन्सच्या ग्राहकांचा वेटिंग किती असेल याची माहिती दिलेली आहे.
ग्लोबल एनकॅपमध्ये किया कॅरेन्सने अॅडल्ट सेफ्टीमध्ये १७ पैकी ९.३० पॉईंट आणि चाईल्ड सेफ्टीमध्ये ४९ पैकी ३०.९९ पॉईंट मिळाले आहेत. परीक्षणासाठी करण्यात आलेल्या व्हेरिअंट क्रॅशमध्ये ६ एअरबॅग होत्या. किया कॅरेन्स स्टँडर्ट व्हेरिअंटमध्ये सहा एअरबॅग दिल्या जातात.
एकच चावी मिळणार...
कार किंवा स्कूटरच्या दोन चाव्या किती उपयोगाच्या असतात हे अनेकांना माहिती आहे. एक सापडत नसली तर दुसऱ्या चावीने गाडी सुरु करता येते. शिवाय गाडीची चोरी झाली तर विमा मिळवून देणारी ती दुसरीच चावी कामी येते. परंतू कियाने मोठा निर्णय घेतला आहे. किया यापुढे काही दिवस, महिने जेवढ्या गाड्या बनवेल त्यांची एकच चावी ग्राहकांना देणार आहे. दुसऱ्या चावीसाठी ग्राहकांना वेटिंगवर रहावे लागणार आहे. सेमीकंडक्टरच्या टंचाईमुळे मोठमोठ्या कंपन्यांची हालत बेकार झाली आहे. पूर्वीपेक्षा हा वेटिंग पिरिएड कमी झालेला असला तरी कंपन्यांना ती चीप मिळविणे कठीण बनत चालले आहे. यामुळे कियाने आपल्या ग्राहकांना यापुढे एकच चावी देण्याच निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक चावीसाठी सेमिकंडक्टरची गरज असते. परंतू, तेवढे ते मिळत नसल्याने ग्राहकांना कारसोबत एकच चावी दिली जाणार आहे. दुसरी चावी काही दिवसांनी मिळेल परंतू त्याची वेळ सांगण्यात आलेली नाही.