सेकंड हँड गाडी घेताना अॅक्सिडेंटल हिस्ट्री कशी तपासाल? एक ट्रिक जी लोकांना माहितीच नाहीय...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 06:00 PM2023-04-18T18:00:59+5:302023-04-18T18:02:34+5:30
Used Car Buying Tips: आजकाल अनेकजण अपघात झाला की कार, बाईक लोकल गॅरेजमध्ये नव्यासारखी करून घेतात. पूर्वी कंपन्यांच्या सर्विस सेंटरमध्ये काम केलेले लोक अशी गॅरेज खोलून बसलेले आहेत.
सध्या नव्या गाड्या घेणे लोकांना परवडणारे नाहीय. आता तर तीन वर्षांपूर्वीच्या डिझेल कारच्या किंमतीत पेट्रोल कार येऊ लागल्या आहेत. स्वस्तातली अल्टोच आता साडेचार-पाच लाखांवर गेली आहे. मग ज्यांचे बजेट कमी आहे ते लोक सेकंड हँड कार घेऊ लागले आहेत. उगाच हप्ते भरा, महागलेले इंधन भरा यापेक्षा जुनी चांगली वापरलेली, अपघात न झालेली कार घेण्याकडे अनेकांचा कल असतो. झालं का... आता अपघात न झालेली कशी शोधायची...
...तर नव्या कारवर देखील वॉरंटी नाकारतात कंपन्या; या गोष्टींशी छेडछाड करू नका
आजकाल अनेकजण अपघात झाला की कार, बाईक लोकल गॅरेजमध्ये नव्यासारखी करून घेतात. पूर्वी कंपन्यांच्या सर्विस सेंटरमध्ये काम केलेले लोक अशी गॅरेज खोलून बसलेले आहेत. यामुळे त्यांच्याकडे याचे कौशल्य असते. यामुळे अपघात झाला की नाही हे तपासण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. परंतू, जर इन्शुरन्स मधून एखाद्याने अपघात झालेल्या कारचे काम करून घेतले असेल तर तुम्ही तसे तपासू शकता. यासाठी सरकार तुम्हाला मदत करणार आहे.
भारतातील कोणत्याही वाहनाचा अपघात इतिहास कसा तपासायचा?
कोणत्याही वाहनाचा अपघात इतिहास तपासण्यासाठी सर्वप्रथम, वाहनाचा आरसी क्रमांक माहिती हवा. यावरून वाहनाचा अतिरिक्त तपशील सहज उपलब्ध होतो.
आरसी नंबर आणि नंबर प्लेटचा नंबर घेतल्यानंतर, तुम्हाला वाहन नोंदणीकृत असलेल्या आरटीओ कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तिथे तुम्हाला अधिकृत साइटवर जाऊन तुमचे राज्य आणि आरटीओ स्थान निवडावे लागेल. त्यानंतर तुम्हाला व्हेईकल इंफॉर्मेंशन सेक्शन मिळेल.
Tyre Burst Accident: भर वेगात टायर फुटण्यापासून स्वत:ला कसे वाचवाल? नंतर वेळ निघून गेलेली असते...
RTO वेबसाइटवर नोंदणी क्रमांक टाकून तुम्ही तुमच्या वाहनाचा अपघात रेकॉर्ड तपासू शकता. यामुळे कारचे किती अपघात झाले आहेत आणि ते ‘स्क्रॅप’ वाहन म्हणून घोषित करण्यात आले आहे की नाही याची झटपट माहिती मिळेल. तुम्ही रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या (MORTH) वेबसाइटला भेट देऊन वाहनाची इतर माहिती देखील मिळवू शकता.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाने एकीकृत रस्ते अपघात डेटाबेस (IRAD) तयार केला आहे. या अॅपद्वारे, पोलिस, अपघाताच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर, अपघाताचा संपूर्ण तपशील भरतो, जो थेट भारत सरकारपर्यंत पोहोचतो. पोलीस कर्मचारी आणि सहाय्यक विभागीय परिवहन अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमध्ये हे अॅप उपलब्ध असते.