पेट्रोल-डिझेलची कार इलेक्ट्रिक केल्यानं फायदा होईल की बसेल दंड? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 05:44 PM2022-09-12T17:44:51+5:302022-09-12T17:48:13+5:30

भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे लोकांची झोप उडाली आहे. पेट्रोल-डिझेलवरील वाहनं वापरणं आता पूर्वीपेक्षा महाग झालं आहे. लोक आता पेट्रोल आणि डिझेलला पर्याय शोधत आहेत.

how to convert your petrol or diesel cars into an electric vehicle retrofit cost in india | पेट्रोल-डिझेलची कार इलेक्ट्रिक केल्यानं फायदा होईल की बसेल दंड? जाणून घ्या...

पेट्रोल-डिझेलची कार इलेक्ट्रिक केल्यानं फायदा होईल की बसेल दंड? जाणून घ्या...

googlenewsNext

भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे लोकांची झोप उडाली आहे. पेट्रोल-डिझेलवरील वाहनं वापरणं आता पूर्वीपेक्षा महाग झालं आहे. लोक आता पेट्रोल आणि डिझेलला पर्याय शोधत आहेत. काही कार मालक एक चांगला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक कारकडे वळत आहेत. पण नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करणं ही देखील खूप महागडी डील आहे. इंधनावर आधारित कारचे इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतर करण्याची सुविधाही बाजारात उपलब्ध आहे. कार मालक त्यांच्या कारला सहजपणे इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतरित करू शकतात. पण असं करणं फायदेशीर आहे का आणि ते बेकायदेशीर नाही का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात...

इलेक्ट्रिक कार बनवणं स्वस्त नाही
पेट्रोल-डिझेलच्या कारला इलेक्ट्रिक कार बनवता येईल, असा काही वर्षांपूर्वी विचारही नव्हता. परंतु आता असं करणं पूर्णपणे शक्य आहे, कारण बाजारातील अनेक कंपन्या तेलावर चालणाऱ्या कारचे इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतर करण्याची सेवा देतात. नवीन इलेक्ट्रिक कार खूप महाग आहेत, परंतु सध्याच्या पेट्रोल-डिझेल कारचे इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतर करणे देखील तितके स्वस्त नाही. ही एक महाग प्रक्रिया आहे आणि यासाठी किमान ५ लाख रुपये खर्च आहे. 

ईव्हीमध्ये कार कव्हर्ट करणं बेकायदेशीर आहे का?
कार मालक त्यांना हवं असल्यास त्यांची सध्याची कार इलेक्ट्रिक कारमध्ये बदलू शकतात. इलेक्ट्रिक वाहनात बदललेली कार चालवल्याबद्दल वाहतूक पोलिस तुम्हाला दंड आकारू शकत नाहीत. केंद्रीय मोटार वाहन कायदा, 1989 मध्ये केलेल्या बदलांनुसार कोणतीही व्यक्ती पेट्रोल-डिझेल कारचे इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतर करू शकते. मोटार वाहन कायद्यांतर्गत पेट्रोल-डिझेल कारचे रीट्रोफिटिंगचे तीन मार्ग असू शकतात.

- सर्व प्रकारच्या वाहनांचं इलेक्ट्रिक वाहनात रुपांतर करता येते
- 3.5 टन पर्यंत वाहनांचे हायब्रिड रूपांतरण
- 3.5 टन पेक्षा जास्त वजनाच्या वाहनांचे संकरीत रूपांतर

इलेक्ट्रिक कारचे फायदे
पेट्रोल-डिझेल कारला इलेक्ट्रिक कार बनवण्याचे किंवा नवीन इलेक्ट्रिक कार घेण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांना इंधन लागत नाही. इलेक्ट्रिक कारची देखभाल देखील खूप कमी आहे. या कार पर्यावरणपूरक आहेत आणि प्रदूषणापासून दिलासा देतात. इलेक्ट्रिक कार खूप हलक्या असतात, त्यामुळे त्या नियंत्रित करणे देखील सोपं असतं. येत्या काही वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: how to convert your petrol or diesel cars into an electric vehicle retrofit cost in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.