रोज हेल्मेट घालताय? मग करा हे काम; होणार नाही नुकसान, म्हणाल थँक्स…
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 02:32 PM2022-08-11T14:32:08+5:302022-08-11T14:32:31+5:30
दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. हे केवळ तुमचे संरक्षण करत नाही, तर तुम्हाला दंड होण्यापासूनही वाचवतं. मात्र, हेल्मेट घालणाऱ्यांना समस्या विचाराल तर त्यांचं उत्तर असतं केस…
Helmet sweating problem: दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. हे केवळ तुमचे संरक्षण करत नाही, तर तुम्हाला दंड होण्यापासूनही वाचवते. मात्र, हेल्मेट घालणाऱ्यांना समस्या विचाराल तर त्याचं उत्तर येतं ते म्हणजे केस. हेल्मेट घातल्यानं हेअरस्टाईल खराब होतेच, पण हे दुय्यम किंवा महत्त्वाचंही कारण नाही. पण दुसरी आणि महत्त्वाची समस्या म्हणजे केस गळण्याची ससम्या. अधिक काळ घातलेल्या हेल्मेटमुळे केसांची समस्या वाढू शकते. या म्समस्येवर उपाय काय आहेत ते आपण पाहूया.
वास्तविक, हेल्मेट जास्त वेळ घालणे तुमच्या केसांसाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे तुमच्या डोक्यात घाम येतो. त्यामुळे केसांच्या मूळांना इजा करतात, ज्यामुळे केस गळतात. जर तुम्हाला अशा प्रकारचे नुकसान टाळायचे असेल तर खाली नमूद केलेल्या काही टीप्स अवश्य वापरा.
- हेल्मेट घातल्याने डोक्याला घाम येतो. त्यामुळे हेल्मेटचा आतील भाग ओला होतो. नुकसान टाळण्यासाठी हेल्मेट नियमितपणे स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे.
- हेल्मेट स्वच्छ आणि हवेशीर ठिकाणी ठेवा जेणेकरून ते सहज सुकेल.
- जर तुम्ही लांबचा प्रवास करत असाल तर वेळोवेळी ब्रेक घेणे आणि हेल्मेट काही वेळासाठी काढणे उत्तम. तुमचे केस आणि हेल्मेट सुकायला थोडा वेळ द्या.
- डोक्यावर सुती कापड बांधणे हा उत्तम उपाय आहे. हेल्मेट घालण्यापूर्वी डोक्यावर कपडा बांधल्याने केस गळण्याचा धोका कमी होतो.
- हेल्मेट स्कल कॅपचे अनेक प्रकारही बाजारात उपलब्ध आहेत. आपण ते ऑनलाइन खरेदी करू शकता. तसंच हेल्मेटच्या आत वापरत असलेला कपडा नियमित धुवत राहा.