मारुतीच्या या दोन कारवर अक्षरशः तुटून पडले ग्राहक, 1 लाखहून अधिक लोकांनी केली बुकिंग!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 10:38 AM2022-08-04T10:38:55+5:302022-08-04T10:40:30+5:30
कंपनीने 'या' दोन्ही एसयूव्ही लॉन्च केल्यानंतर काही दिवसांतच त्यांना 1 लाखहून अधिक बुकिंग मिळाल्या आहेत.
भारतात एसयूव्हीची वाढती मागणी लक्षात घेत मारुती सुझुकीनेही कंबर कसली आहे. सर्वप्रथम कंपनीने आपली सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही ब्रेझा (Maruti Brezza) नव्या रुपात लॉन्च केली. यानंतर, कंपनीने क्रेटा-सेल्टॉसला टक्कर देण्यासाठी मारुती ग्रँड विटाराही (Maruti Grand Vitara) लॉन्च केली. सध्या कंपनीच्या या दोन्ही गाड्यांना ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, कंपनीने या दोन्ही एसयूव्ही लॉन्च केल्यानंतर काही दिवसांतच त्यांना 1 लाखहून अधिक बुकिंग मिळाल्या आहेत. यांपैकी 75 हजार बुकिंग एकट्या नव्या ब्रेझाची झाली आहे. तर ग्रँड विटाराची बुंकिंगदेखील 26 हजारच्या पुढे गेली आहे.
ईटी ऑटोसोबत बोलताना मारुती सुझुकीचे वरिष्ठ कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव म्हणाले, की
कंपनीला आपल्या दोन्ही नव्या एसयूव्हीसाठी जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. मारुती ग्रँड विटाराची अर्ध्याहून अधिक प्री-बुकिंग हायब्रिड टेक व्हेरिअंटसाठी आहे.
नव्या ब्रेझाची सुरुवातीची किंमत 7.99 लाख रुपये एवढी आहे. तर हिच्या टॉप व्हेरिअंटची किंमत 13.80 लाख रुपयांपर्यंत जाते. ही कार एकूण 7 व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. यात 1.5 लीटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.
मारुती ग्रँड विटारा सुझुकीच्या ग्लोबल-सी प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. या मिड साईज एसयूव्हीमध्ये स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजीसह 1.5 लीटर K15C डुअलजेट पेट्रोल इंजिन आणि इंटेलिजेंट हायब्रिड टेक्नॉलॉजीसह 1.5 लीटर TNGA पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. यात मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्यायही उपलब्ध आहे.