'ही' आहे जगातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार, 805km रेंजचा दावा; अशी आहे खासियत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 21:38 IST2022-04-05T21:37:27+5:302022-04-05T21:38:28+5:30
ही इलेक्ट्रिक एसयूव्ही 300 डॉलर म्हणजेच जवळपास 22,000 रुपयांतही बुक करू शकता.

'ही' आहे जगातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार, 805km रेंजचा दावा; अशी आहे खासियत
कारच्या दुनियेत आता एका अशा कारने एंट्री केली आहे, जी सौर उर्जेवर चालते. या कारचे नाव आहे 'हंबल वन' (Humble One). कॅलिफोर्नियातील स्टार्टअप कंपनी हम्बल मोटर्सने (Humble Motors) ही सौरऊर्जेवर चालणारी कार लॉन्च केली आहे. या एसयूव्हीच्या छतावर सोलार पॅनल बसवण्यात आले आहे. Humble One कारची बॅटरी सूर्यप्रकाश आणि विजेवरही चार्ज होऊ शकते. ही बॅटरी पॉवर सॉकेट, स्टँडर्ड ईव्ही चार्जिंग पॉइंट आणि ईव्ही फास्ट चार्जनेही चार्ज केले जाऊ शकते.
या कारच्या किमतीसंदर्भात बोलायचे झाल्यास, कारची किंमत 1,09,000 डॉलर म्हणजेच जवळपास 80 लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही 300 डॉलर म्हणजेच जवळपास 22,000 रुपयांतही बुक करू शकता. साधारणपणे गेल्या दोन वर्षांपासून या कारवर काम सुरू होते. या कारचे प्रोडक्शन 2024 मध्ये सुरू होईल आणि 2025 मध्ये डिलिव्हरी सुरू होईल, असे कंपनीने म्हटले आहे.
ही कार म्हणजे इलेक्ट्रिक कारच्या जगातातील एक मोठा शोध मानला जात आहे. हंबल वन कार पाच सीटर एसयूव्ही आहे. या कारच्या छतावर फोटोव्होल्टेइक सेलने तयार करण्यात आलेले 82.35 स्क्वेअर फुटांचे सोलर पॅनल आहे. Humble One कारची मोटर 1020hp जनरेट करते.
इंधनाच्या वाढत्या किमती आणि प्रदूषणाची समस्या, या पार्श्वभूमीवर ही कार म्हणजे आशेचा नवा किरण आहे. तसेच, Humble One इलेक्ट्रिक SUV एका सिंगल चार्जवर 805 किमीपर्यंतचे अंतर कापू शकते. तर केवळ सोलर मोडवर ही कार सुमारे 96 किमीपर्यंत धावू शकते, असा दावा Humble Motors ने केला आहे.