टाटा पंचचा खेळ बिघडवण्यासाठी येतेय ह्युंदाईची नवी SUV, फीचर्स जास्त अन् किंमत असेल कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 06:45 PM2023-04-05T18:45:29+5:302023-04-05T18:47:07+5:30
कंपनी लवकरच ही कार बाजारात दाखल करेल, अशी अपेक्षा आहे. जाणून घ्या डिटेल्स...
आपण भारतीय बाजारासाठी एका नव्या SUV वर काम करत आहेत, अशी घोषणा कार उत्पादक कंपनी Hyundai Motor India Limited (HMIL) ने नुकतीच केली आहे. तसेच, ही नवीन एसयूव्ही ग्राहकांना स्मार्ट मोबिलिटीचा एक्सपेरिअन्स देईल, असेही कंपनीने म्हटले आहे. ही नवी SUV टाटा पंचला टक्कर देण्याची शक्यता आहे. ही SUV नुकतीच भारतीय रस्त्यांवरही दिसली होती. सध्या Hyundai ने या नव्या SUV संदर्भात अधिक खुलासा केलेला नाही. कंपनी लवकरच ही कार बाजारात दाखल करेल, अशी अपेक्षा आहे. जाणून घेऊयात डिटेल्स...
Ai3 कोडनेमचा वापर करतेय कंपनी -
Hyundai आपल्या नव्या छोट्या SUV साठी Ai3 कोडनेमचा वापर करत असल्याचे बोलले जात आहे. ह्युंदाई (Hyundai) Ai3 ग्रँड i10 Nios च्या वर पण व्हेन्यूच्या खाली असेल. यामुळे, ही कार Tata Punch, Citroen C3, Maruti Suzuki Ignis, Nissan Magnite आणि Renault Kiger सारख्या कारना जबरदस्त फाईट देईल. तसेच हिची किंमतही टाटा पंचच्या जवळपास अथवा त्याहूनही कमी असू शकते.
न्यू एसयूव्हीचे इंजिन पॉवरट्रेन -
नवी Hyundai Ai3 ला पॉवर देणारे 1.2-लिटर नॉर्मल एस्पिरेटेड इंजिन असेल. जे अनेक ह्युंदाई (Hyundai) मॉडेल्स, जसे ग्रँड i10 Nios, i20 आणि ऑरावर काम करते. हे 82bhp आणि 113nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यात सक्षम आहे. हे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स अथवा 5-स्पीड एएमटीसह येते.
ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचे तरुण गर्ग म्हणाले, आम्ही पुन्हा एकदा ग्राहकांना एका नव्या एसयूव्हीसह खुश करण्यासाठी सज्ज आहोत. जी लवकरच येत आहे. भारतातील एक अग्रगण्य स्मार्ट मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदाता म्हणून, ग्राहकांसाठी एक सर्वोत्तम एसयूव्ही ऑफर करणे हे आमचे लक्ष्य आहे.