Hyundai Alcazar SUV च्या प्रतीक्षेत असलेल्यांसाठी वाईट बातमी; कार लाँच लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 05:26 PM2021-05-23T17:26:52+5:302021-05-23T17:29:05+5:30

Hyndai Alcazar Suv : कंपनी याच महिन्यात कार लाँच करण्याच्या होती तयारीत. अनेक कारप्रेमींना आहे या SUV ची प्रतीक्षा

Hyundai Alcazar 6 Seater SUV Prices To Be Announced In June 2021due to coronavirus pandemic | Hyundai Alcazar SUV च्या प्रतीक्षेत असलेल्यांसाठी वाईट बातमी; कार लाँच लांबणीवर

Hyundai Alcazar SUV च्या प्रतीक्षेत असलेल्यांसाठी वाईट बातमी; कार लाँच लांबणीवर

Next
ठळक मुद्देकंपनी याच महिन्यात कार लाँच करण्याच्या होती तयारीत. अनेक कारप्रेमींना आहे या SUV ची प्रतीक्षा

Hyundai Motors India ची बहुप्रतीक्षीत  6/7 सीटर Hyundai Alcazar SUV भारतीय बाजारात लाँच होण्यासाठी सज्ज झाली आहे. याच महिन्यात कंपनी ही कार बाजारात आणण्याच्या प्रयत्नात होती. परंतु आता या कारच्या लाँचबद्दल नवी माहिती समोर आली आहे.  (Hyundai Alcazar SUV Launch date Postponed Till June 2021 due to Coronavirus Pandemic)

समोर आलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणूच्या महासाथीमुळे कंपनीनं Hyundai Alcazar SUV चं लाँच टाळण्याचा विचार केला आहे. आता ही कार जून २०२१ मध्ये लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, यानंतरही परिस्थिती कायम राहिली तर या कारचं लाँच आणखी पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

ह्यंदाईकडे दोन एसयुव्ही असल्या तरी त्या पाच सीटरच आहेत. यामुळे टाटा सफारी, एमजी हेक्टर प्लस, महिंद्रा एक्सयुव्ही 500 सारख्या एसयुव्हींना टक्कर देण्यासाठी ह्युंदाईला नवी कार बाजारात उतरवण्याची गरज होती. मारुतीकडे देखील दोन सेव्हेन सीटर कार आहेत. यामुळे ह्युंदाईने सेव्हेन सीटर एसयुव्ही भारतीय बाजारात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. (Hyundai Alcazar ) 

क्रेटाचे काही फीचर्स मिळणार

ह्युंदाई अल्काझारमध्ये एसयुव्ही क्रेटाची काही फिचर मिळणार आहेत. दोन्हा कारचा प्लॅटफॉर्म एकच असणार आहे. फ्लॅटर रूफलाईन, एलईडी डीआरएल प्रोजेक्टेड हेडलँप, नवीन सी कॉलम, सी शेपड् एलईडी टेल लँप आणि नवीन डिझाईनचा बंपर आदी देण्यात येणार आहे. तसेच या कारला 18 इंचाचे व्हील्स देण्यात येण्याची शक्यता आहे. क्रेटाला 17 इंचाचे अलॉय व्हील्स आहेत. 

इंजिन क्षमता

Hyundai Alcazar मध्ये दोन इंजिन पर्याय मिळण्याची शक्यता आहे. 1.4-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 1.5-लीटर टर्बो-डिझेलचे इंजिन असेल. पेट्रोल इंजिन 138bhp ताकद आणि 250Nm चा टॉर्क प्रदान करेल. तर डिझेल इंजिन 113bhp ताकद आणि 250Nm टॉर्क प्रदान करेल. कंपनी यामध्ये 1.5-लीटर 4-सिलेंडर नॅचरली अॅस्पिरेटेड इंजिनाचा देखील वापर करण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: Hyundai Alcazar 6 Seater SUV Prices To Be Announced In June 2021due to coronavirus pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.