Hyundai धमाका करणार; नव्या सात सीटर एसयुव्ही Alcazar ची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 03:57 PM2021-02-24T15:57:03+5:302021-02-24T15:58:27+5:30
Hyundai Alcazar global launch soon: दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी ह्युंदाईच्या सर्वाधिक खपाच्या क्रेटा एसयुव्हीचे 7 सीटर व्हर्जन येणार असल्याची गेल्य़ा काही काळापासून चर्चा सुरु होती. याच्या मॉडेलच्या नावावरून देखील चर्चा होत होती. आता कंपनीने हे नाव जाहीर केले आहे.
दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी ह्युंदाईच्या सर्वाधिक खपाच्या क्रेटा एसयुव्हीचे 7 सीटर व्हर्जन येणार असल्याची गेल्य़ा काही काळापासून चर्चा सुरु होती. याच्या मॉडेलच्या नावावरून देखील चर्चा होत होती. आता कंपनीने हे नाव जाहीर केले आहे. Hyundai Alcazar असे नाव देण्यात आले असून लवकरच ही सात सीटर एसयुव्ही लाँच केली जाणार आहे. ( Creta's 7-seater version, Officially named as Hyundai Alcazar)
नवे रंग, नवे इंजिन! नवी Maruti Suzuki Swift लाँच; मोठमोठ्या SUV चे फिचर्स
ह्युंदाईने या एसयुव्हीचा एक टीझरही जारी केला आहे. Hyundai Alcazar ही कार येत्या एप्रिलपर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे. ह्युंदाई ही कार “personify reliability and indulgence” वर तयार केली आहे. भारतात लाँच झाल्यावर ही कार एमजी हेक्टर प्लस, टाटा सफारी आणि आगामी महिंद्रा एक्सयुव्ही 500 ला टक्कर देणार आहे.
Tata Safari Launch: नव्या टाटा सफारीची किंमत जाहीर झाली; जाणून घ्या फिचर्स आणि व्हेरिअंट
नवीन ह्युंदाई अल्काझर एसयुव्ही ही क्रेटामध्ये मिळणाऱ्या छतऐवजी फ्लॅटर रुफची असणार आहे. ही कार क्रेटापेक्ष वेगळी असणार आहे. पाठीमागे नवीन एलईडी टेललँप आणि फ्लॅटर प्रोफाईलसह नवीन बंपर आणि टेलगेट देण्यात येणार आहे. 7 सीटर कारमध्ये क्रोम स्टडेड रेडिएटर ग्रील, नवीन बंपर आणि हेडलँप मिळणार आहेत.
MG Moters कडून नवी ‘हेक्टर २०२१’ लाँच; इंग्लिश नाही तर हिंग्लिश कमांड्सही देता येणार
या कारमध्ये सहा आणि सात सीटरचा पर्याय़ देण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच क्रेटापेक्षा जास्त मोठी 10.25 इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देण्याची शक्यता आहे. नवीन मॉडेल ऑटो डिमिंग IRVM, 360 डिग्री कॅमरा, लेदर अपहोल्स्ट्री आणि फ्रंट पार्किंग सेंसर ने युक्त असणार आहे.
2021 Jeep Compass भारतात लाँच; पाहा किती आहे किंमत आणि काय आहेत बदल
इंजिन...
Hyundai Alcazar मध्ये दोन इंजिन पर्याय मिळण्याची शक्यता आहे. 1.4-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 1.5-लीटर टर्बो-डिझेलचे इंजिन असेल. पेट्रोल इंजिन 138bhp ताकद आणि 250Nm चा टॉर्क प्रदान करेल. तर डिझेल इंजिन 113bhp ताकद आणि 250Nm टॉर्क प्रदान करेल. कंपनी यामध्ये 1.5-लीटर 4-सिलेंडर नॅचरली अॅस्पिरेटेड इंजिनाचा देखील वापर करण्याची शक्यता आहे.