अब टाटा की EVs का क्या होगा? ही कंपनी बाजारात आणतेय तब्बल 31 इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 12:56 AM2023-04-12T00:56:01+5:302023-04-12T00:56:53+5:30
ह्युंदाई मोटरने स्वतःला जगातील टॉप तीन ईव्ही उत्पादकांपैकी एक बनविण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
ह्युंदाई मोटर या कार उत्पादक कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक कारचा पोर्टफोलिओ आणि उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढविण्याची तयारी केली आहे. यासाठी Hyundai मोटर समूहाने 2030 पर्यंत सुमारे 24 ट्रिलियन वॉन (18.2 अब्ज डॉलर) एवढ्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. एवढेच नाही, तर ह्युंदाई मोटरने स्वतःला जगातील टॉप तीन ईव्ही उत्पादकांपैकी एक बनविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या शिवाय, कंपनी या दशकाच्या अखेरपर्यंत कोरियातील आपल्या इलेक्ट्रिक कारचे वार्षिक उत्पादन 1.51 मिलियन युनिट्सपर्यंत वाढवण्याच्या योजनेवरही काम करत आहे.
31 ईव्ही मॉडल होणे अपेक्षित -
Hyundai Motor Group मध्ये Hyundai Motor Co., Kia Corp., लक्झरी Genesis ब्रांड आणि पार्ट्स तसेच सर्व्हिस आर्म Hyundai Mobis Co चा समावेश आहे. ह्युंदाईने म्हटले आहे की, 2030 पर्यंत त्यांच्या स्वतःच्या ब्रँडचे 31 ईव्ही मॉडेल तयार होणे अपेक्षित आहे. याशिवाय, किआ सियोलच्या दक्षिणेस ह्वासेओंग शहरात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करण्यासाठी एक नवा प्लँट तयार करेल.
लवकरच लॉन्च होणार किआची नवी ईव्ही
Kia या वर्षाच्या अखेरीस कोरियामध्ये थ्री-लाईन सीट असलेली इलेक्ट्रिक एसयूव्ही, ईव्ही9 सादर करण्याची तयारी करत आहे. तसेच ह्युंदाईची 2024 मध्ये Hyundai Ioniq 7 सादर करण्याची योजना आहे.
3.5 मिलियन वार्षिक ईव्ही विक्रीचे लक्ष्य -
कंपनीने मंगळवारी केलेल्या घोषणेतून स्पष्ट होते की, ह्युंदाईचा फोकस ग्रीन फ्यूचरवर आहे. ह्युंदाई आणि जेनेसिसकडे 2030 पर्यंत किमान 17 ईव्ही सादर होणे अपेक्षित आहे. यात किआच्या 14 ईव्हींचा समावेश असेल. यामुळे 2030 मध्ये कंपनीला 3.5 मिलियनच्या वार्षिक ईव्ही विक्रीचे लक्ष्य साध्य करण्यास मदत होईल.