Hyundai Car Price Hike : आधी व्याजदर वाढले, आता कार्सच्या किंमती; ह्युंदाईचा ग्राहकांना झटका, वाढल्या कारच्या किंमती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 04:18 PM2023-04-03T16:18:44+5:302023-04-03T16:19:00+5:30
Hyundai Car Price Hike : ह्युंदाईनं आपल्या ग्राहकांना झटका दिला आहे. क्रेटा, ह्युंदाई वेन्यू अल्काझरपासून अनेक कार्सच्या किंमती कंपनीनं वाढवल्या आहेत. पाहा डिटेल्स.
भारतीय बाजारपेठेत ह्युंदाईकार्सची (Hyundai Car) मागणी सातत्यानं वाढत आहे. ह्युंदाईनं 1 एप्रिल 2023 पासून आपल्या कारच्या किमतीत 13,000 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. दरम्यान, सर्वच व्हेरिअंटमध्ये एकसारखी वाढ करण्यात आलेली नाही. पाहूया कंपनीनं कोणत्या कारच्या किंमतीत किती रुपयांनी वाढ केली.
ह्युंदाई क्रेटा (Hyundai Creta) बद्दल बोलायचं झाले तर त्याच्या किमती 7000 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. दरम्यान, 1.4 DCT S+ DT, 1.5 MT SX एक्झिक्युटिव्ह, 1.4 DCT SX (O) आणि 1.5 MT SX एक्झिक्युटिव्ह सारख्या पेट्रोल व्हेरिअंटच्या किंमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. तर, 1.5L MPi पेट्रोल इंजिनच्या E, EX, S, S+ नाइट आणि SX व्हेरिअंटच्या किंमतीत 3000 रुपयांनी वाढ करण्यात आलीये.
1.5L MPi आणि 1.5 IVT SX, 1.5 IVT SX (O) आणि 1.5 IVT SX (O) नाइट सारख्या 1.5L MPi आणि IVT पॉवरट्रेन कॉम्बोसह सर्व पेट्रोल व्हेरिअंटची किंमत 7,000 रुपयांनी वाढली आहे. नवीन दरवाढीनंतर, क्रेटा पेट्रोलची रेंज 10.87 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 18.34 लाख रुपयांपर्यंत जाते. क्रेटाच्या डिझेल 1.5 MT SX एक्झिक्युटिव्ह व्हेरिअंटच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. याशिवाय इतर डिझेल व्हेरिअंच्या किंमतीत 7,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता डिझेल व्हेरियंटची किंमत 11.96 लाखांपासून सुरू होते आणि 11.89 लाखांपर्यंत जाते.
Alcazar आणि Tucson ची किंमतही वाढली
Alcazar आणि Tucson च्या किमतीच्या वाढीबद्दल बोलायचे झाल्यास, Alcazar च्या सर्व पेट्रोल आणि डिझेल व्हेरिअंटमध्ये 3,000 रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे, जर आपण ह्युंदाईच्या फ्लॅगशिप SUV Tucson बद्दल बोललो तर त्याच्या किंमतीत 12,000 ते13,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
वेन्यू आणि वेन्यू एनच्या किंमतीतही वाढ
ह्युंदाई वेन्यू पेट्रोल बेस E 1.2 MT, S 1.2 MT, S (O) 1.2 MT आणि S (O) 1.0 iMT च्या किमती 3,000 रुपयांनी वाढल्या आहेत. फक्त SX 1.2 MT आणि SX (O) 1.0 iMT च्या किंमतीत 4,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. S (O) 1.0 DCT आणि SX (O) 1.0 DCT सारख्या DCT गिअरबॉक्ससह ऑटो व्हेरिअंटच्या किंमतीत 7,000 रुपयांची किंमत वाढ झाली आहे. वेन्यू पेट्रोलची किंमत आता 7.71 लाख रुपयांपासून सुरू होते.
वेन्यू डिझेल व्हेरिअंटची किंमत S+ 1.5 MT ची किंमत 6,000 रुपयांनी वाढली आहे, तर SX 1.5 MT आणि SX (O) 1.5 MT व्हेरिअंटची किंमत 7,000 रुपयांनी वाढली आहे. वेन्यू डिझेलची किंमत 10.46 लाख रुपयांपासून सुरू होते. वेन्यू N Line एंट्री लेव्हल N6 DCT व्हेरियंटची किंमत आता 12.67 लाख रुपयांपासून सुरू होत आहे.