ह्युंडाईच्या 'या' लोकप्रिय कारवर डिस्काउंट ऑफर; जाणून घ्या, खरेदीवर किती होईल बचत?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 01:34 PM2023-02-08T13:34:42+5:302023-02-08T13:35:54+5:30

ह्युंडाई इंडियाने फेब्रुवारी 2023 मध्ये आपल्या निवडक कारच्या विविध मॉडेल्सवर 33,000 पर्यंत डिस्काउंट ऑफर जारी केला आहे.

hyundai cars discount february up to 33 thousand on aura i20 and grand i10 nios | ह्युंडाईच्या 'या' लोकप्रिय कारवर डिस्काउंट ऑफर; जाणून घ्या, खरेदीवर किती होईल बचत?

ह्युंडाईच्या 'या' लोकप्रिय कारवर डिस्काउंट ऑफर; जाणून घ्या, खरेदीवर किती होईल बचत?

googlenewsNext

नवी दिल्ली : फेब्रुवारी महिना सुरू होताच कार उत्पादक कंपन्यांनी आपल्या कारची विक्री वाढवण्याच्या किंवा जुना स्टॉक क्लिअर करण्याच्या उद्देशाने आकर्षक सवलतीच्या ऑफर देणे सुरू केले आहे, ज्यामध्ये पहिले नाव ह्युंडाई इंडिया (Hyundai India) आहे. ह्युंडाई इंडियाने फेब्रुवारी 2023 मध्ये आपल्या निवडक कारच्या विविध मॉडेल्सवर 33,000 पर्यंत डिस्काउंट ऑफर जारी केला आहे.

ह्युंडाई इंडियाने जारी केलेल्या या डिस्काउंट ऑफरमध्ये कॅश ऑफर, एक्सचेंज बेनिफिट्स आणि कॉर्पोरेट डिस्काउंट देखील आहे. ह्युंडाई इंडियाची कार डिस्काउंट ऑफर फक्त 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत वैध असणार आहे. जर तुम्ही फेब्रुवारी महिन्यात ह्युंडाई इंडियाची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर याठिकाणी जाणून घ्या कंपनी कोणत्या कारवर किती सूट देत आहे.

Hyundai Aura 
ह्युंडाई ऑरा ही एक प्रीमियम सेडान कार आहे, ज्यावर कंपनी सीएनजी व्हेरिएंटवर 33,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे. या डिस्काउंटमध्ये 20,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. याशिवाय, कंपनी ह्युंडाई ऑरा सब-4 मीटर सेडानच्या इतर सर्व व्हेरिएंटवर 10,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे. जो सर्व मिळून एकूण 23,000 रुपये आहे.

Hyundai i20 
ह्युंडाई i20 ही एक प्रीमियम हॅचबॅक कार आहे. ही कार स्पोर्टी डिझाइन आणि फीचर्समुळे लोकांना आवडते. फेब्रुवारीमध्ये ह्युंडाई इंडिया या कारच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटवर वेगवेगळे डिस्काउंट देत आहेत. तुम्ही ह्युंडाई i20 चे Sportz किंवा Magna व्हेरिएंट विकत घेतल्यास कंपनी 10,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे.

Hyundai Grand i10 Nios
ह्युंडाई ग्रँड i10 नियोस ही ह्युंडाई कंपनीची सर्वात स्वस्त कार आहे. ही कार कंपनीने नुकतीच लॉन्च केली आहे. कंपनी फेब्रुवारी महिन्यात या हॅचबॅकवर 13,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. या डिस्काउंटमध्ये 10,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे.

महत्त्वाची सूचना...
ह्युंडाई इंडियाद्वारे तीन कारवर जारी केलेली डिस्काउंट ऑफर देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये भिन्न असू शकते. त्यामुळे या डिस्काउंटच्या ऑफर अंतर्गत कार खरेदी करण्यापूर्वी डिस्काउंट ऑफरचे संपूर्ण डिटेल्स मिळविण्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा तुमच्या जवळच्या ह्युंडाई डीलरशिपला भेट द्या.
 

Web Title: hyundai cars discount february up to 33 thousand on aura i20 and grand i10 nios

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.