Tata Panch आणि Citroen C3 चे टेन्शन वाढणार; Hyundai Casper लवकरच मैदानात उतरणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 01:16 PM2022-08-29T13:16:36+5:302022-08-29T13:17:24+5:30

Hyundai Casper Micro Suv : Hyundai Casper च्या डायमेंशन आणि टेक्नॉलॉजीबद्दल बोलायचे झालास रिपोर्ट्सनुसार, कंपनी ही मायक्रो SUV लेटेस्ट K1 प्लॅटफॉर्मवर तयार करत आहे.

Hyundai Casper Micro Suv Launch Soon In India Compete With Tata Punch And Citroen C3 Read Estimated Price And Features | Tata Panch आणि Citroen C3 चे टेन्शन वाढणार; Hyundai Casper लवकरच मैदानात उतरणार!

Tata Panch आणि Citroen C3 चे टेन्शन वाढणार; Hyundai Casper लवकरच मैदानात उतरणार!

googlenewsNext

मायक्रो एसयूव्ही सेगमेंटमधील रिक्त जागा लक्षात घेऊन ह्युंदाई मोटर्स (Hyundai Motors) लवकरच आपली नवीन micro SUV लाँच करणार आहे, तिचे नाव ह्युंदाई कॅस्पर (Hyundai Casper) असे आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी दिवाळीच्या सणासुदीच्या काळात भारतात Hyundai Casper SUV लाँच करू शकते. रिपोर्ट्सनुसार, कंपनी Hyundai Casper मायक्रो SUV सेगमेंटमधील सर्वात स्वस्त SUV असू शकते.

Hyundai Casper च्या डायमेंशन आणि टेक्नॉलॉजीबद्दल बोलायचे झालास रिपोर्ट्सनुसार, कंपनी ही मायक्रो SUV लेटेस्ट K1 प्लॅटफॉर्मवर तयार करत आहे. SUV ही 3,595 मिमी लांब, 1,595 मिमी रुंद आणि 1,575 मिमी उंच बनवण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार, या SUVच्या पुढील भागात कंपनीने राउंड शेप हेडलॅम्प, नवीन डिझाइन केलेले फ्रंट आणि रियर बंपर, सिंगल स्लॅट फ्रंट ग्रिल, डीआरएल, फ्रंट आणि रियरमध्ये स्किड प्लेट्स, स्पोक आणि अलॉय व्हील्स जोडले आहेत.

Hyundai Casper Engine and Transmission
Hyundai Casper च्या इंजिन आणि पॉवरबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही, पण रिपोर्ट्सनुसार, कंपनी या मायक्रो एसयूव्हीमध्ये पेट्रोल इंजिन देईल, ज्यामध्ये दोन ट्रिम्सचा पर्याय मिळतील. Hyundai Casper चे पहिले इंजिन 1.1 लीटर नॅच्युरली एस्पिरेटेड इंजिन आहे आणि दुसरे 1.2 लीटर टर्बोचार्ज्ड केलेले पेट्रोल इंजिन आहे. या दोन्ही इंजिनसह 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड एएमटी ट्रान्समिशन पर्याय आढळू शकतात.

Hyundai Casper Features
Hyundai Casper SUV मध्ये दिलेल्या फीचपर्सबद्दल सांगायचे झाले तर, कंपनी अँड्रॉइड ऑटो आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटीसह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, कॅमेरासह रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, क्रूझ कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल्स, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ईबीडी, फ्रंट सीटवर ड्युअल एअरबॅग्ज यांसारखी फीचर्स दिली जाऊ शकतात.

Hyundai Casper Rivals
Hyundai Casper च्या किंमतीबद्दल कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही, परंतु रिपोर्ट्सनुसार, कंपनी 5 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह बाजारात लॉन्च करू शकते. भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्यानंतर, ही Hyundai Casper ची मायक्रो SUV सेंगमेंटमधील लोकप्रिय मारुती एस्प्रेसो, टाटा पंच आणि Citroen C3 सारख्या SUV सोबत स्पर्धा करण्याची शक्यता आहे.

Web Title: Hyundai Casper Micro Suv Launch Soon In India Compete With Tata Punch And Citroen C3 Read Estimated Price And Features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.