आता टाटाचं काय खरं नाय! दुसऱ्या नंबरसाठी लढा, ह्युंदाईने आणली सहा लाखांत एक्सटर, CNG ही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 04:58 PM2023-07-10T16:58:26+5:302023-07-10T16:59:07+5:30
Hyundai Exter Price Variants: या छोट्या एसयुव्हीमुळे टाटाच्या पंचला थेट टक्कर मिळणार आहेच परंतू, मारुतीच्या फ्राँक्सला, निस्सान मॅग्नाईट आणि रेनॉ कायगरसारख्या गाड्यांना देखील टक्कर देणार आहे.
ह्युंदाईने खरोखरच टाटाने दुसरा नंबर पटकावलेले मनावर घेतलेले आहे. मारुतीला काही या कंपन्या मागे टाकू शकत नाहीएत. परंतू, पहिला नाही निदान दुसऱ्यासाठीतरी लढू अशी भावना आता या कंपन्यांमध्ये येऊ लागली आहे. गेल्या काही महिन्यांपासून टाटा आणि ह्युंदाईमध्ये दुसऱ्या क्रमांकाची स्पर्धा रंगली आहे. आता त्यात टिकून राहण्यासाठी ह्युंदाईने आपली छोटी एसयुव्ही एक्सटर लाँच केली आहे.
या छोट्या एसयुव्हीमुळे टाटाच्या पंचला थेट टक्कर मिळणार आहेच परंतू, मारुतीच्या फ्राँक्सला, निस्सान मॅग्नाईट आणि रेनॉ कायगरसारख्या गाड्यांना देखील टक्कर देणार आहे. कंफर्ट, स्टाइल, स्पोर्टीनेस, मायलेज, सेगमेट फर्स्ट वॉयस इनेबल्ड इलेक्ट्रिक सनरूफ आणि ड्युअल डॅशकॅम सारखी फिचर्स यामध्ये देण्यात आली आहेत. ह्युंदाई एक्सटरची एक्सशोरुम किंमत 5.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
महत्वाचे म्हणजे या एसयुव्हीला पेट्रोलसह सीएनजी पर्यायातही लाँच करण्यात आली आहे. ही किंमत ह्युंदाईची इंट्रॉडक्टरी किंमत आहे. EX, S, SX, SX(O) असे चार ट्रिम आणि त्यात विविध व्हेरिअंट आहेत. 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आणि मॅन्युअल ट्रान्समिशनची किंमत 5,99,900 रुपये आणि एस व्हेरिअंटची किंमत 7,26,990 रुपये, एसएक्सची 7,99,990 रुपये, एक्सएस ऑप्शनलची किंमत 8,63,990 व एसएक्स ऑप्शनल कनेक्टची किंमत 9,31,990 रुपये आहे.
तर स्मार्ट अॅटोमॅटीक व्हेरिअंटची किंमत 7,96,980 रुपये आहे. सीएनजी व्हेरिअंटची सुरुवातीची किंमत 8,23,990 रुपये आहे. Hyundai Exter 1.2L 4 सिलेंडर कप्पा पेट्रोल इंजिन 19.4 kmpl पर्यंत मायलेज देते. तर, 1.2L 4 सिलेंडर द्वि-इंधन कप्पा पेट्रोल CNG प्रकार 27.1 किमी/किलो मायलेज देते. एक्स्टरचा ग्राउंड क्लीयरन्स 180 मिमी आणि बूट स्पेस 319 लीटर आहे. सीएनजी