Hyundai Exter : ह्युंदाईची नवीन SUV टाटा पंचला देणार टक्कर, टीझर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 01:46 PM2023-04-14T13:46:59+5:302023-04-14T13:50:48+5:30
कंपनीने नवीन एसयूव्हीच्या टीझरमध्ये मॉडेल दाखवलेले नाही. पण येत्या काही महिन्यांत कारची विक्री सुरू होणार असल्याची पुष्टी झाली आहे.
नवी दिल्ली : ह्युंदाई मोटर इंडियाने (Hyundai Motor India) आपल्या आगामी एसयूव्हीच्या (SUV) नावाचा खुलासा केला आहे. आता ही एसयूव्ही ह्युंदाई एक्सटर (Hyundai Exter) या नावाने लाँच केली जाईल. Hyundai च्या इंडिया लाइनअपमधील ही आठवी कार असणार आहे. ही कार मार्केटमध्ये आल्यानंतर टाटा पंचला टक्कर देऊ शकते. कंपनीने नवीन एसयूव्हीच्या टीझरमध्ये मॉडेल दाखवलेले नाही. पण येत्या काही महिन्यांत कारची विक्री सुरू होणार असल्याची पुष्टी झाली आहे.
कार ऑगस्ट 2023 मध्ये लाँच होईल अशी शक्यता आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, ह्युंदाईची नवीन कार कंपनीची सर्वात छोटी एसयूव्ही असणार आहे. कारची लांबी देखील जवळपास 3.8 मीटर असणे अपेक्षित आहे. तसेच, कारची किंमत देखील परवडणाऱ्या श्रेणीत असणार आहे. कार कंपनीच्या लाइनअपमधील व्हॅन्यूपासून खाली ठेवले जाईल. Hyundai Exter ही Grand i10 Nios हॅचबॅकच्या प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल.
सध्या याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही, मात्र कारची बरीचशी माहिती लीक झाली आहे. कंपनीने एसयूव्हीची चाचणी सुरू केली आहे आणि ती अनेक वेळा स्पॉट झाली आहे. यामध्ये राउंड फॉग लॅम्प, एच पॅटर्न एलईडी डीआरएल, कंपनीचे सिग्नेचर ग्रिल आणि स्प्लिट हेडलॅम्प मिळू शकतात. यासोबत कारच्या टॉप व्हेरिएंटमध्ये अलॉय व्हील्स दिले जाऊ शकतात.
Imagine lying under a canopy of twinkling stars. Feel the splash of a wild waterfall. Think outside. Think EXTER. The all-new SUV #HyundaiEXTER is coming soon to take you places.
— Hyundai India (@HyundaiIndia) April 14, 2023
Know more: https://t.co/JgP6L0MUai#Hyundai#HyundaiIndia#Thinkoutside#ComingSoon#ILoveHyundaipic.twitter.com/wAUTDuXSP0
फीचर्स
लीक्सनुसार, या एसयूव्हीचे इंटीरियर i10 आणि Venue सारखे असणार आहे. फीचर्सच्या बाबतीत, हे टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिटसह येऊ शकते, जे Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटीसह येईल. यामध्ये सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रियर एसी व्हेंट्स, सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि अनेक कनेक्टेड कार फीचर्स मिळू शकतात.
इंजिन
Hyundai Exter मध्ये 1.2 लीटर आणि 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनचा पर्याय दिला जाऊ शकतो. यासोबत मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असे दोन्ही पर्याय मिळतील.