टाटा टियागो अन् मारुती स्विफ्टलाही भारी पडू शकते ही ढासू कार, 7 दिवसांत होतेय लॉन्च!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 07:22 PM2023-01-13T19:22:37+5:302023-01-13T19:26:21+5:30
खरे तर, ग्राहकांमध्ये ह्युंदाईच्या कारला मोठी मागणी आहे आणि यामुळेच ही कंपनी जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनली आहे.
ऑटो एक्सपो 2023 मध्ये Hyundai ने आपली एक ढासू कार आयोनिक-6 लॉन्च केली आहे. याचबरोबर कंपनीने आपल्या पुढच्या इलेक्ट्रिक कार आयोनिक-9 चे कॉन्सेप्ट मॉडेलही या एक्सपोमध्ये सादर केले आहे. खरे तर, ग्राहकांमध्ये ह्युंदाईच्या कारला मोठी मागणी आहे आणि यामुळेच ही कंपनी जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनली आहे.
ह्युंदाई आपली अपडेटेड ग्रँड i10 आधिकृतपणे 20 जानेवारीला देशात लॉन्च करत आहे. कंपनीने शुक्रवारी एका प्रेस कॉन्फ्रन्सदरम्यान ही माहिती दिली. ह्युंदाईची ही हॅचबॅक बाजारात येऊन बरेच दिवस झाले आहेत. मात्र, ग्रँड i10 ची जादू अद्यापही कामय आहे. यावेळी ह्युंदाई या कारला आपल्या SUV सारख्या बॉडी टाइप्स आणि डिझाइनला प्राथमिकता देत आहे.
अनेक चांगल्या अपडेट्ससह येणार -
Hyundai Grand i10 Nios फेसलिफ्टसाठी काही दिवसांपूर्वीच बुकिंग सुरू करण्यात आली होती. न्यू व्हेरिअंट कारच्या डिझाइनला अत्यंत उत्कृष्ट अपडेट्स मिळाले आहेत. कारचे इंटीरिअरही अत्यंत आधुनिक पद्दधतीने अपडेट करण्यात आले आहे. जे पुर्वीपेक्षाही सुंदर दिसते. याच बरोबर हिचे फीचर्सदेखील अपडेट करण्यात आले आहेत. न्यू ग्रँड i10 Nios ऑल-ब्लॅक रेडिएटर ग्रिल आणि न्यू LED DRLs सह येते. या कारला 15-इंचाचे अलॉय व्हील्स डिझाइन देण्यात आल्याचे दिसते. हिच्या टेल गेट डिझाइनला सर्वसाधारण अपडेट करण्यात आले आहे. टेल लाइट्सदेखील सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत थोडे वेगळे आहे.
8 इंचांचे इंफोटेनमेंट स्क्रीन -
अपडेटेड Hyundai Grand i10 Nios च्या केबिनमध्ये अपडेटेड 8 इंचाचे मेन इंफोटेनमेंट स्क्रीन, वायरलेस फोन चार्जिंग सिस्टिम आणि एक अपडेटेड इंस्ट्रूमेंट क्लस्टर मळते. या कारमध्ये क्रूझ कंट्रोल, ESC, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम सारख्ये फीचर्स देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, Hyundai Grand i10 Nios च्या सर्व व्हेरिअंटमध्ये 4 एअरबॅग्ज देत आहे.
इंजिन स्पेसिफिकेशन -
2023 Hyundai Grand i10 Nios न्यू स्पार्क ग्रीन शेडसह 6 बॉडी कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात येईल. या कारमध्ये 1.2-लिटर कप्पा पेट्रोल इंजिन बघायला मिळेल. हे एका मॅन्युअल ट्रान्समिशन युनिटशी जोडलेले असते. तसेच, हे AMT ऑप्शनही असू शकते. याच बरोबर कंपनी फिटेड सीएनजीही देत राहील.
या कारसोबत असेल फाईट -
Hyundai Grand i10 Nios ही यंग लुक्स आणि स्पोर्टी ड्राइव्ह ट्रेट्ससाठी पसंत केली जाते. Grand i10 Nios ची टक्कर Maruti Suzuki Swift आणि Tata Tiago सोबत असेल. याशिवाय ही Citroen C3 आणि Renault Triber सारख्या मॉडेल्सनाही टक्कर देईन.