Hyundai in Auto Expo 2023: ह्युंदाईने मारुतीवर गेम खेळला! दाखविली Ioniq 6, लाँच केली Ioniq 5
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 12:52 PM2023-01-11T12:52:11+5:302023-01-11T12:52:39+5:30
ह्युंदाईच्या या लाँचिंगवेळी बॉलिवूडचा किंग खान शाहरूख उपस्थित होता. गेल्या २५ वर्षांपासून शाहरुख ह्युंदाईचा ब्रँड अॅम्बॅसिडर आहे.
यंदाच्या ऑटो एक्स्पोमध्ये मारुती सुझुकीने पहिली इलेक्ट्रीक कारचे प्रोटोटाईप दाखवून धमाल उडवून दिली आहे. अशातच हुंदाई मागे राहिल ती कसली. ह्युंदाईने दुसरी इलेक्ट्रीक कार भारतात लाँच केली आहे.
ह्युंदाईने यावेळी मोठा गेम खेळला आहे. ह्युंदाईने ऑटो एक्स्पोमध्ये दोन इव्ही कार आणल्या आहेत. यामध्ये एक लाँच केली तर दुसरी दाखविली आहे. ह्युंदाईने Ioniq 5 लाँच करताना पुढील कार आयोनिक ६ दाखविली आहे. याचबरोबर ह्युंदाईने क्रेटाचे फेसलिफ्टही लाँच केले आहे. मारुतीनंतर एमजी मोटर्सने MG 4 EV ही हायब्रिड कार दाखविली आहे. तसेच एमजी हेक्टरचे फेसलिफ्ट लाँच केले आहे.
ह्युंदाईच्या या लाँचिंगवेळी बॉलिवूडचा किंग खान शाहरूख उपस्थित होता. गेल्या २५ वर्षांपासून शाहरुख ह्युंदाईचा ब्रँड अॅम्बॅसिडर आहे. ह्युंदाईने मेड इन इंडिया आयोनिक ५ ही ईलेक्ट्रीक कार 44.95 lakh रुपयांना लाँच केली आहे. ही कार किया ईव्ही ६ पेक्षा १६ लाख रुपयांनी कमी आहे.
IONIQ 5 V2L फंक्शनसह येते जे 3.6 kw पर्यंत वीज पुरविते. V2L पोर्ट दुसऱ्या रोमधील सीटखाली आहे. कार चालू असताना ते सुरु करता येते. आणखी एक V2L पोर्ट कारच्या बाहेर आहे. कन्व्हर्टरद्वारे कार मालक अन्य उपकरणेदेखील चार्ज करू शकतात. यामध्ये तुम्ही ईलेक्ट्रीक स्कूटरदेखील वेगाने चार्ज करू शकता.