IONIQ 5: Hyundai करणार धमाका! नवी इलेक्ट्रीक कार येतेय, सिंगल चार्जवर ३५० किमी धावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 01:08 PM2022-08-16T13:08:17+5:302022-08-16T13:09:38+5:30

दक्षिण कोरियाची कार कंपनी ह्युंदाई भारतात आपल्या कार लाइनअपला आणखी मजबूत करण्यासाठी लवकरच इलेक्ट्रीक कार लॉन्च करणार आहे.

hyundai ioniq 5 new electric car in india will run 350 km on a single charge | IONIQ 5: Hyundai करणार धमाका! नवी इलेक्ट्रीक कार येतेय, सिंगल चार्जवर ३५० किमी धावणार

IONIQ 5: Hyundai करणार धमाका! नवी इलेक्ट्रीक कार येतेय, सिंगल चार्जवर ३५० किमी धावणार

Next

दक्षिण कोरियाची कार कंपनी ह्युंदाई भारतात आपल्या कार लाइनअपला आणखी मजबूत करण्यासाठी लवकरच इलेक्ट्रीक कार लॉन्च करणार आहे. इलेक्ट्रिक कारची भारतीय बाजारपेठेतील क्रेझ लक्षात घेता आणि ह्युंदाईनंही या क्षेत्रात एन्ट्री घेण्याचं ठरवलं आहे. कंपनीनं नुकतीच Hyundai Tucson कारचं नवं मॉडल भारतात लॉन्च केलं. समोर आलेल्या माहितीनुसार ह्युंदाई आता आपली नवी इलेक्ट्रीक एसयूव्ही  IONIQ 5 बाजारात आणणार आहे. 

आगामी IONIQ 5 ही Hyundai Kona नंतर भारतात दाखल होणारी कंपनीची दुसरी इलेक्ट्रीक कार असेल. Kia EV6 चं फिचर्स आणि पॉवरट्रेन नवीन इलेक्ट्रिक SUV मध्ये वापरले जाऊ शकतात. सिंगल चार्जवर, IONIQ 5 इलेक्ट्रिक SUV 300-350 किमी अंतर कापेल. नवीन इलेक्ट्रिक SUV ची संभाव्य वैशिष्ट्ये आणि वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूया. 

जास्त स्पेस आणि आरामदायी केबीन
आगामी IONIQ 5 इलेक्ट्रिक कार संपूर्णपणे नॉक्ड डाउन (CKD) रुटने भारतात येईल. Hyundai च्या इलेक्ट्रिक e-GMP प्लॅटफॉर्मसाठी नवीन बनवलेल्या आधारावर, IONIQ 5 इलेक्ट्रिक कारमध्ये Kia EV6 चेच मॅकेनिकल कंपोनेट्स आणि पॉवरट्रेन ऑप्शन्स पाहायला मिळतील. IONIQ 5 मध्ये ग्राहकांना अधिक जागा आणि आरामदायी केबिन मिळण्याची अपेक्षा आहे.

IONIQ 5 चे फीचर्स
IONIQ 5 उत्कृष्ट कामगिरी आणि वेगाच्या आधारे बाजारात मजबूत स्पर्धा देईल. IONIQ 5 मध्ये मोठा सनरूफ, वायरलेस मोबाइल चार्जर, डिजीटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, लार्ज इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, कनेक्टेड कार टेक, पुश बटण स्टार्ट, सीट व्हेंटिलेशन यांसारखी अनेक वैशिष्ट्ये पाहायला मिळतील.

IONIQ 5 संभाव्य किंमत
Hyundai च्या नवीन इलेक्ट्रिक SUV कारमध्ये 169hp चा सिंगल मोटर सेटअप आणि 58kWh चा बॅटरी पॅक मिळू शकतो. समोर आलेल्या माहितीनुसार, ही इलेक्ट्रिक कार एका चार्जवर 300-350 किमी धावेल. Hyundai ने IONIQ 5 लाँच किंवा किंमतीबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. IONIQ 5 ची अपेक्षित किंमत 50 लाखांपेक्षा कमी (एक्स-शोरूम) असू शकते.

Web Title: hyundai ioniq 5 new electric car in india will run 350 km on a single charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.