Hyundai नवीन कॉम्पॅक्ट एसयुव्ही आणण्याच्या तयारीत; निस्सान मॅग्नाईट, रेनॉ किगरला टक्कर देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 10:50 AM2021-03-29T10:50:21+5:302021-03-29T10:50:36+5:30
Hyundai new Compact SUV comming soon: ह्युंदाईच्या ताफ्यात व्हेन्यू (Hyundai Venue) ही मिनी एसयुव्ही आहे. तरीदेखील त्यापेक्षा खालच्या श्रेणीमधील ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी ह्युंदाई प्रयत्न करत आहे.
भारतातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची ऑटोमोबाईल कंपनी छोट्या एसयुव्ही (Compact SUV) सेगमेंटमध्ये आणखी एक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. ह्युंदाई (Hyundai) या छोट्या एसयुव्हीची टेस्टिंग करत आहे. निस्सान मॅग्नाईट, रेनॉ किगरमुळे आता मोठमोठ्या कंपन्यांनादेखील या सेगमेंटच्या वाढत्या मागणीचा विचार करावा लागत आहे. (Hyundai is testing new compact SUV.)
ह्युंदाईच्या ताफ्यात व्हेन्यू (Hyundai Venue) ही मिनी एसयुव्ही आहे. तरीदेखील त्यापेक्षा खालच्या श्रेणीमधील ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी ह्युंदाई प्रयत्न करत आहे. या नव्या येणाऱ्या कॉम्पॅक्ट एसयुव्हीची टेस्टिंग दक्षिण कोरियामध्ये सुरु झाली आहे. या कारची टेस्टिंग करतानाची स्पाय इमेज समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच सेमी कॅमोफ्लाईड मॉडेल दिसले आहे, जे उत्पादन करण्यास तयार मॉडेस असल्याचे बोलले जात आहे.
ह्युंदाईच्या या कारच्या इंजिनबाबत अद्याप कोणतही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतू कारमध्ये 1.0 लीटर डायरेक्ट इंजेक्शन पेट्रोल इंजिन देण्यात येण्याची शक्यता आहे.
केव्हा लाँच होणार....
या कारच्या लाँचिंगबाबत अद्याप काही कंपनीने सांगितलेले नाहीय. परंतू ही कार या वर्षीच्या अखेरीस बाजारात आणली जाऊ शकते. याचबरोबर कंपनी त्यांची पॉप्युलर हॅचबॅक i20 नवीन अवतारात लाँच करण्याची शक्यता आहे. भारतात नुकतीच आय 20 कार लाँच केली आहे, त्याचे हे पुढील व्हर्जन असणार आहे.
Hyundai धमाका करणार; नव्या सात सीटर एसयुव्ही Alcazar ची घोषणा
ह्युंदाईच्या सर्वाधिक खपाच्या क्रेटा एसयुव्हीचे 7 सीटर व्हर्जन येणार असल्याची गेल्य़ा काही काळापासून चर्चा सुरु होती. याच्या मॉडेलच्या नावावरून देखील चर्चा होत होती. आता कंपनीने हे नाव जाहीर केले आहे. Hyundai Alcazar असे नाव देण्यात आले असून लवकरच ही सात सीटर एसयुव्ही लाँच केली जाणार आहे. ह्युंदाईने या एसयुव्हीचा फोटोदेखील प्रसिद्ध केला आहे.
Hyundai Nexo: पहिली हायड्रोजन कार देशात लाँच होण्याची शक्यता; धुराच्या जागी करणार पाण्याचं उत्सर्जन
Hyundai Nexo Hydrogen Car: सध्या देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतींमुळे खिशावर ताण पडत आहे. परंतु लवकरच देशात एका नव्या प्रकारच्याकारमध्ये प्रवास करण्याची संधी मिळू शकते. दक्षिण कोरियाची कार उत्पादक कंपनी Hyundai ला आपल्या नव्या फ्युअल सेल इलेक्ट्रिक एसयूव्ही Nexo साठी मंजुरी मिळाली आहे. याव्यतिरिक्त लवकरत ही कार भारतीय बाजारपेठेतही लाँच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.