Hyundai च्या 4 लाखांच्या मायक्रो एसयुव्हीचा टीझर लाँच; पहा कशी दिसते...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 01:50 PM2021-05-09T13:50:50+5:302021-05-09T13:51:29+5:30
Hyundai AX1 Micro SUV Teaser photo: या मायक्रो एसयुव्हीची टेस्टिंग भारतातही सुरु झाली आहे. ह्युंदाईने या कारचे सुरुवातीचे नाव AX1 ठेवले आहे.
Hyundai AX1 Micro SUV: ह्युंदाई (Hyundai) चार लाखांत मायक्रो एसयुव्ही आणणार आहे. एवढ्या कमी किंमतीत ही कार येणार असल्याने साऱ्यांचे लक्ष या कारकडे लागून राहिले आहे. कंपनीने नुकताच या छोट्या कारचा टीझर लाँच केला आहे. AX1 सर्वप्रथम दक्षिण कोरियामध्ये उतरविली जाणार आहे. यानंतर कंपनीसाठी महत्वाचे असलेल्या भारतात उतरविली जाणार आहे. (Hyundai Teases Upcoming Micro SUV Codenamed AX1)
डिझाईन...
कंपनीने दाखविलेल्या टीझरमध्ये वेब सारख्या पॅटर्नमध्ये फ्रंट ग्रील देण्यात आली आहे. यामुळे या कारचे रुपडेच नवीन वाटणार आहे. टीझर पाहिल्यानंतर ही कार एक बॉक्सी एसयुव्ही वाटत आहे. ह्युंदाई AX1 च्या बंपरवर एक एलईडी डे टाईम रनिंग लाई रिंगसह गोलाकार हेड लाईट दिसत आहे. त्याच्यावर एक स्लिक एलईडी डीआरएल देण्यात आला आहे. टीझर इमेजमध्ये टेललाईट एका त्रिकोणी पॅटर्नमध्ये दिसते.
या मायक्रो एसयुव्हीची टेस्टिंग भारतातही सुरु झाली आहे. ह्युंदाईने या कारचे सुरुवातीचे नाव AX1 ठेवले आहे. ही एक मायक्रो एसयुव्ही असणार आहे. जगभरात या कारचे वेगवेगळे व्हेरिअंट दिसले आहेत. तसेच सध्या या कारचे काही चोरून काढलेले फोटो, व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. मारुतीकडे सध्या मस्क्युलर लुकमध्ये एस प्रेसो (maruti suzuki s presso) ही कार आहे. तर अन्य कंपन्यांकडे पाच लाखांपासून सुरु होणाऱ्या कॉम्पॅक्ट एसयुव्ही आहेत. यापेक्षा जास्त किंमतीत ह्युंदाईच्या हॅचबॅक कार आहेत. यामुळे ह्युंदाईला छोट्या मस्क्युलर कारची गरज भासत आहे. Hyundai AX1 Micro SUV चे डिझाईन हे एखाद्या एसयुव्हीप्रमाणे आहे. काही फोटोंनुसार ह्युंदाईच्या या कारचा रिअर लुक हा वेगळा आहे. यामध्ये एलईडी टेल लँपला पारंपरिक लुक देण्यात आला आहे. मात्र, टर्न इंडिकेटर गोलाकार आहेत जे बंपरवर देण्यात आले आहेत. तसेच ट्विन एक्झॉस्टही दिसला आहे.
या कारमध्ये दोन इंजिनचा पर्याय मिळू शकतो. Hyundai AX1 मध्ये 1.1 लीटर आणि 1.2 लीटरचे इंजिन दिले जाण्याची शक्यता आहे. 1.1 लीटर इंजिन 69 पीएस ताकद आणि 99 एनएम चा पीक टॉर्क उत्पन्न करेल. तसेच 1.2 लीटर इंजिन 83 पीएस ताकद आणि 113 एनएम चा पीक टॉर्क उत्पन्न करेल. दोन्ही इंजिनांना 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअर बॉक्स दिला जाणार आहे. या कारची किंमत ही 4 लाखांपासून सुरु होण्याची शक्यता आहे.