50 हजारांत बुक करा शानदार Hyundai Tucson SUV; स्वतःच ब्रेक लावते, 10 ऑगस्ट होणार लाँच!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 03:52 PM2022-08-04T15:52:24+5:302022-08-04T15:54:12+5:30

Hyundai New Car : कंपनीची ही प्रीमियम एसयूव्ही सेगमेंटमधील Citroen C5 Aircross सारख्या गाड्यांशी स्पर्धा करेल. कंपनीने कारचे बुकिंगही सुरू केले आहे. ग्राहक 50 हजार रुपये भरून ही एसयूव्ही बुक करू शकतात.

hyundai tucson suv with radar launch date on 10 aug book for 50000 rupees know features | 50 हजारांत बुक करा शानदार Hyundai Tucson SUV; स्वतःच ब्रेक लावते, 10 ऑगस्ट होणार लाँच!

50 हजारांत बुक करा शानदार Hyundai Tucson SUV; स्वतःच ब्रेक लावते, 10 ऑगस्ट होणार लाँच!

Next

नवी दिल्ली : ह्युंदाई मोटार ( Hyundai Motor) भारतात 10 ऑगस्ट रोजी 2022 Tucson facelift एसयूव्ही लाँच करणार आहे. पहिले 4 ऑगस्ट रोजी लाँच केले जाणार होते. कंपनीची ही प्रीमियम एसयूव्ही सेगमेंटमधील Citroen C5 Aircross सारख्या गाड्यांशी स्पर्धा करेल. कंपनीने कारचे बुकिंगही सुरू केले आहे. ग्राहक 50 हजार रुपये भरून ही एसयूव्ही बुक करू शकतात.

विशेष बाब म्हणजे, Hyundai ची ही पहिली एसयूव्ही आहे, जी भारतात लेव्हल 2 च्या ADAS फीचर्सला सपोर्ट करेल. यामध्ये ऑटोमेटेड सेंसिंग टेक्नॉलॉजी,  कोणत्याही ऑब्जेक्टला डिटेक्ट करण्यासाठी कॅमेरा आणि रडार सेन्सर असतील. कठीण परिस्थितीत ही कार स्वतःच ब्रेक लावू शकते.

नवीन पिढीची Hyundai Tucson नवीन लुकसह अपडेट करण्यात आली आहे. एसयूव्हीमध्ये LED हेडलाइटसह मोठी ग्रिल देण्यात आली आहे. हेडलाइट अशा प्रकारे दिले आहेत की, ते ग्रिलचा भाग असल्याचे दिसते. खाली एलईडी फॉग लँप्स मिळतात. तुम्हाला एसयूव्हीच्या मागील बाजूस अपडेटेड एलईडी टेललाइट्स देण्यात आले आहेत.

इंटीरियर अपडेट
इंटीरियरच्या बाबतीत या कारमध्ये 10.1-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 10.1-इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले आहे. कंपनीने यामध्ये अॅम्बियंट लाइटिंग, वायरलेस चार्जिंग, 360-डिग्री कॅमेरा, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, कीलेस एंट्री आणि ऑटो डिमिंग ORVM सारखे फीचर्स देखील दिले आहेत. याव्यतिरिक्त, यामध्ये 29 फर्स्ट-इन-सेगमेंट फीचर्स असतील. नवीन Tucson ची किंमत 25 लाख रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. डिझेल इंजिन असलेल्या Tucson ची किंमत 30 लाख रुपयांच्या आत असू शकते.

इंजिन
कंपनीची ही एसयूव्ही दमदार इंजिनसह आणण्यात आली आहे. यात दोन इंजिन ऑप्शन 2.0-लिटर पेट्रोल आणि 2.0-लिटर डिझेल इंजिन आहेत. पेट्रोल इंजिन सहा-स्पीड ऑटोमॅटिक आणि डिझेल इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. पेट्रोल इंजिन 156  पीएसची मॅक्सिमम आउटपुट देते, तर डिझेल इंजिन 186 पीएसची पॉवर निर्माण करण्यास सक्षम आहे.

Web Title: hyundai tucson suv with radar launch date on 10 aug book for 50000 rupees know features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.