जणू क्रेटाची धाकटी बहीणच; ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्ट लाँच, किंमतही कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 08:32 AM2022-06-17T08:32:05+5:302022-06-17T09:00:15+5:30
ह्युंदाईच्या या कारमध्ये इंजिन मात्र बदलण्यात आलेले नाही. या एसयुव्हीमध्ये ३ इंजिन ऑप्शन देण्यात आले आहेत.
देशातील तिसऱ्या क्रमांकावर गेलेली सर्वात मोठी कंपनी ह्युंदाईने भारतीय बाजारात ह्युंदाई व्हेन्यूचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच केले आहे. कमी किंमतीतली एसयुव्ही म्हणून ही खूप लोकप्रिय झाली होती. परंतू नंतर अन्य कंपन्यांच्या कार आल्याने या कारची मागणी घटली होती.
व्हेन्यूचे ६ व्हेरिअंट लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये E, S, S+, S(O), SX आणि SX(O) हे आहेत. या सब कॉम्पॅक्ट एसयुव्हीला मिड लाईफ सायकल अपडेटनुसार अपडेट करण्यात आले आहे. तसे पहायला गेले तर ह्युंदाईच्या क्रेटाचे हे छोटे मॉडेल आहे. आतून आणि बाहेरून कॉस्मेटिक अपडेट करण्यात आले आहेत.
व्हेन्यूमध्ये पॅरामेट्रीक ज्वेल ग्रील ऑफर करण्यात येत आहे. यामध्ये क्रोमचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये मेन हेडलँप्सला नवीन बंपरच्या खाली देण्यात आले आहेत. पाठीमागेही सेगमेंटेड लायटिंग एलिमेंट्स आणि फुल लेंथ लाईट बार सोबत अँग्युलर लाईट्स देण्यात आले आहेत. या अपडेट्ससोबत एसयुव्हीमध्ये अलॉय व्हील्स देखील देण्याच आले आहेत.
इंटीरिअरमध्ये आत 10.25 इंचाची टच स्क्रीन इंफोटन्मेंट Bose सिस्टिम देण्यात आली आहे. मोठे बदल म्हणजे फेसलिफ्ट व्हेरिअंटमध्ये रिवाईज्ड सेंट्रल कंसोल, स्टिअरिंग व्हील देण्यात आले आहे.
ह्युंदाईच्या या कारमध्ये इंजिन मात्र बदलण्यात आलेले नाही. या एसयुव्हीमध्ये ३ इंजिन ऑप्शन देण्यात आले आहेत. यामध्ये 1.2L NA पेट्रोल, 1.0L टर्बो-पेट्रोल आणि 1.5L टर्बो-डिझेल इंजिन देण्यात आले आहे. काही काळाने 6-स्पीड आयएमटी किंवा ऑयल बर्नरसोबत अॅटोमॅटीक व्हर्जन यामध्ये येऊ शकते. याशिवाय ७ स्पीड डीसीटी देखील असेल. अशाप्रकारे तीन गिअर बॉक्समध्ये फेसलिफ्ट उपलब्ध केली जाणार आहे.