Hyundai Venue Knight Edition : ह्युंदाईने लाँच केले व्हेन्यूचे नाईट एडिशन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 17:10 IST2023-08-18T17:09:52+5:302023-08-18T17:10:21+5:30
कारच्या इंटीरियरबद्दल बोलायचे झाल्यास व्हेन्यू नाईट एडिशन क्रेटा नाईट एडिशन प्रमाणेच आहे.

Hyundai Venue Knight Edition : ह्युंदाईने लाँच केले व्हेन्यूचे नाईट एडिशन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स...
नवी दिल्ली : दिग्गज कार निर्मात्या कंपनींपैकी एक असलेली ह्युंदाईने (Hyundai)आपल्या सब-कॉम्पॅक्ट SUV व्हेन्यूचे नवीन व्हर्जन लाँच केलं आहे. विशेष म्हणजे कंपनीने कारचा लूक पूर्णपणे ब्लॅक कलरचा केला आहे. ब्लॅक आउट लूक असलेली ही नाईट एडिशन आहे. या कारच्या कलर ऑप्शनबद्दल बोलायचे झाल्यास, ही कार 4 मोनोटोन आणि 1 ड्युअलटोन कलरमध्ये येते. ज्यामध्ये अॅबिस ब्लॅक, अॅटलस व्हाईट, टायटन ग्रे, फायरी रेड आणि अॅबिस ब्लॅकचा समावेश आहे. याशिवाय, कारच्या इंटीरियरबद्दल बोलायचे झाल्यास व्हेन्यू नाईट एडिशन क्रेटा नाईट एडिशन प्रमाणेच आहे. या कारमध्ये ब्लॅक कलरची फ्रंट ग्रिल, ह्युंदाई लोगो, ब्रास कलरचा फ्रंट आणि रियर बंपर इन्सर्ट आहे.
व्हेन्यू नाईट एडिशन कारला पुढील व्हीलवर ब्रास कलरचे इन्सर्ट, सेम कलरचा रूफ आणि डार्क क्रोम रिअर ह्युंदाई लोगो देण्यात आला आहे. तसेच, तुम्हाला ब्लॅक कलरची हायलाईट रेल, शार्क-फिन अँटेना आणि लाल फ्रंट ब्रेक कॅलिपरसह ओआरव्हीएम मिळतात. ब्लॅक कलरची अलॉय व्हील/व्हील कव्हर्स, ब्लॅक फ्रंट आणि रिअर स्किड प्लेट्स, बॉडी कलर डोअर हँडल यांचा देखील समावेश आहे. इंटिरिअर्स बद्दल बोलायचे झाल्यास, या कारमध्ये ब्रास कलरच्या इन्सर्टसह ब्लॅक सीट अपहोल्स्ट्री आणि ब्रास कलर हायलाईट्स संपूर्ण ब्लॅक लूक पूर्ण करतात. फीचर्समध्ये आता ड्युअल कॅमेरे आणि मेटल पॅडलसह डॅशकॅम समाविष्ट आहे.
व्हेन्यू नाईट एडिशन S(O) आणि SX व्हेरिएंटमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनसह 1.2L पेट्रोल इंजिन आणि SX(O) व्हेरिएंटमध्ये 6MT आणि 7DCT सह 1.0L टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. या कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या कारची किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरू होते तर टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत 13.4 लाख रुपयांपर्यंत आहे. दरम्यान, अलिकडेच ह्युंदाईने एक्सटर (Xeter) लाँच केली आहे. तसेच, लवकरच कंपनी आणखी नवीन कार आणण्यासाठी सज्ज आहे. एक्सेटरला काही सेगमेंट फर्स्ट फीचर्स मिळतात. यात सहा एअरबॅग्ज, सेल्फी पर्यायासह ड्युअल कॅमेरा डॅशकॅम, व्हॉईस कंट्रोल्ड सनरूफ, कनेक्टेड सूटसह 8-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 4.2-इंचाचा मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले आहे.