Tata Nexon ला तोडीस तोड, ह्युंदाईची खास SUV लॉन्च; 21 हजार रुपयांत बुकिंग सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 09:59 PM2022-08-25T21:59:37+5:302022-08-25T22:00:22+5:30
स्टँडर्ड मॉडेलच्या तुलनेत, नवीन Hyundai Venue N लाइनमध्ये काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. हे स्पोर्टियर व्हर्जन आहे.
ह्युंदाई मोटर इंडियाने आपली ह्युंदाई व्हेन्यू एन लाइन एसयूव्ही लॉन्च केली आहे. आता 6 सप्टेंबर, 2022 पासून हिची विक्री सुरू होणार आहे. बाजारात अवतरण्यापूर्वीच कंपनीने व्हेन्यू एन लाइनची बुकींग सुरू केली आहे. ही कार 21,000 रुपयांच्या टोकन रकमेवर बुक केले जाऊ शकते. इंटरेस्टेड ग्राहक ही Hyundai क्लिक टू बाय प्लॅटफॉर्म (ऑनलाइन) अथवा Hyundai Signature आउटलेटवरून बुक करू शकतात.
यासंदर्भात बोलताना, 'i20 N लाइनला खरेदीदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे आणि नवीन Venue N Line ही "फन ड्रायव्हिंग SUV एक्सपेरिअन्स" आणखी वाढवेल,' असे Hyundai Motor India चे MD आणि CEO उन्सु किम यांनी म्हटले आहे.
स्टँडर्ड मॉडेलच्या तुलनेत, नवीन Hyundai Venue N लाइनमध्ये काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. हे स्पोर्टियर व्हर्जन आहे. याला समोरील बाजूस एन-लाइन बॅजिंगसह डार्क क्रोम ग्रिल आहे. बंपर, फेंडर्स, साइड सिल्स आणि रूफ रेल्सवर लाल हायलाइट्स असतील. मॉडेलमध्ये डायमंड कट्स, R16 अलॉय असेल. हिच्यावर N ब्रँडिंगही मिळेल. यात स्पोर्टी टेलगेट स्पॉयलर मिळते आणि साईड फेंडरवर एन लाइन लिहिलेले मिळते. एवढेच नाही, तर केबिनमध्येही स्पोर्टियर थीम कायम ठेवण्यात आली आहे.
व्हेन्यू एन लाइनमध्ये गिअर नॉब, सेंटर कंसोल आणि डॅशबोर्डवर लाल इंसर्टसह ऑल-ब्लॅक इंटीरिअर देण्यात आले आहे. ब्लॅक अपहोल्स्ट्रीमध्ये सीट्स आणि डोअर ट्रिम्सवर कॉन्ट्रास्ट रेड स्टिचिंग आहे. फीचरसंदर्भात बोलायचे झाल्यास, कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे स्पोर्टियर व्हर्जन वायरलेस अॅप्पल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटीसह 8.0-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम, बोस ऑडियो सिस्टम, ब्लूलिंक कनेक्टेड कार टेक, इलेक्ट्रिक सनरूफ सह येईल.