ह्युंदाईचा मोठा निर्णय! क्रेटा, आय २०सह व्हेर्नाचे ११ व्हेरिअंट केले बंद; कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 03:42 PM2023-01-10T15:42:11+5:302023-01-10T15:45:17+5:30
दक्षिण कोरियाची कंपनी ह्युंदाईने आपल्या कारच्या व्हेरिअंटमध्ये मोठे बदल केले आहेत.
दक्षिण कोरियाची कंपनी ह्युंदाईने आपल्या कारच्या व्हेरिअंटमध्ये मोठे बदल केले आहेत. एप्रिल २०२३ पासून रिअल ड्रायव्हिंग एमिशन नॉर्मस लागू होणार आहेत. यामुळे डिझेल कारची विक्री करणे कंपन्यांना महागात पडणार आहे. यामुळे आतापासूनच कंपन्यांनी डिझेल कार बंद करण्यास सुरुवात केली आहे.
2023 Hyundai Aura: 6 एअरबॅग आणि २८ पेक्षा अधिकचे मायलेज; ह्युंदाईची जबरदस्त सेदान कार येतेय
ह्युंदाईने तीन कार क्रेटा, व्हर्ना आणि आय२० चे काही व्हेरिअंट बंद केले आहेत. कंपनीने एकूण ११ व्हेरिअंट बंद केले आहेत. Hyundai Creta चे 1.4 Turbo GDI DCT S+ आणि 1.5 iMT S बंद होणार आहेत. या कार जानेवारीपासूनच बंद होतील. क्रेटा 1.5-लीटर MPi पेट्रोल, 1.5-लीटर डिझेल आणि 1.4-लीटर टर्बो पेट्रोल युनिट्ससह तीन इंजिन पर्यायांसह येते.
i20 च्या बंद केलेल्या प्रकारांच्या यादीमध्ये i20 Asta(O) 1.5 CRDi MT, Magna 1.5 CRDi MT आणि Sportz 1.5 CRDi MT यांचा समावेश आहे. हे व्हेरिअंट २३ जानेवारीपासून बंद होतील. i20 Sportz 1.0 Turbo GDi iMT ची मर्यादित युनिट्स उपलब्ध असतील. या कारचा स्टॉक संपताच ते देखील बंद केले जातील.
Hyundai Verna चे 1.0 Turbo GDI DCT SX(O) प्रकार 23 जानेवारीपासून बंद केला जाईल. तर 1.5 लिटर डिझेलसह MT S+, MT SX आणि 1.5 लिटर पेट्रोलसह MT S+, MT SX फेब्रुवारीपासून बंद केले जाणार आहेत.