साऱ्या जगाने मानली भारताची चिकाटी; ह्युंदाईच्या या कारने तब्बल 5731 मीटर उंची गाठली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 10:26 AM2020-01-20T10:26:58+5:302020-01-20T10:40:20+5:30
जगातील सर्वात उंचीवर जात या कारने गिनिज बुकमध्ये नाव कोरले आहे. तिबेटच्या सावुला पास या ठिकाणी तब्बल 5731 मीटर उंचीवर ही कार चालविण्य़ात आली. याआधी 5715.28 मीटर उंचीवर चालविण्याचा विक्रम निओ ईएस80 या कारच्या नावे होता.
ह्युंदाईची भारतीय बनावटीची इलेक्ट्रीक कार कोनाने जागतिक विक्रम केला आहे. जगातील सर्वात उंचीवर जात या कारने गिनिज बुकमध्ये नाव कोरले आहे. तिबेटच्या सावुला पास या ठिकाणी तब्बल 5731 मीटर उंचीवर ही कार चालविण्य़ात आली. याआधी 5715.28 मीटर उंचीवर चालविण्याचा विक्रम निओ ईएस80 या कारच्या नावे होता.
ह्युंदाईची ही कार एका सामान्य पोर्टेबल चार्जरद्वारे चार्ज करण्यात येत होती. तीव्र चढणीच्या रस्त्यावर कारने अजिबात संघर्ष केला नाही, असा दावा कंपनीने केला आहे.
ह्युंदाईचे भारतातील कार्यकारी अधिकारी एस एस किम यांनी सांगितले की, कोना इलेक्ट्रीकमुळे ह्युंदाईच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. इलेक्ट्रीक वाहनांबाबतच्या अफवांना कोनाने खोटे ठरविले आहे. कोनाने जगातील सर्वात कठीण भागात यशस्वीपणे जात तिच्यातील ताकद सिद्ध केली आहे.
ह्युंदाईच्या कोनामध्ये 100 किलो वॅटची मोटार देण्यात आलेली आहे. तर या मोटारला 39.2 किलो वॅटची बॅटरी ताकद पुरविते. यामुळे 131 बीएचपीची ताकद निर्माण होते. तर 395 एनएम टॉर्क मिळतो. या इलेक्ट्रीक एसयुव्हीची रेंज एका चार्जिंगमध्ये 452 किमी आहे. तर बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी साध्या चार्जरद्वारे सात ते आठ तास लागतात. जर फास्ट चार्जर असेल तर हीच बॅटरी 80 टक्के चार्ज होण्यासाठी केवळ 1 तास लागतो.
वाहतूक कोंडीपासून होणार सुटका; पुढील 3 वर्षात येणार हवेत उडणारी कार?
Hyundai Grand i10 Nios नव्या ढंगात लाँच; पहिल्यांदाच छोट्या कारमध्ये भन्नाट फिचर्स
सर्वात सुरक्षित कार Tata Nexon EV येणार; एका चार्जिंगमध्ये 300 किमी धावणार
Review: टाटाची स्वस्तातली 'रेंज रोव्हर' खरंच साजेशी आहे का? वाचा TATA Harrier कशी आहे...
Hyundai Kona Electric ने बर्फवृष्टी, उणे तापमान आणि बर्फाच्छादित रस्त्यांवर चांगले प्रदर्शन केले. पोर्टेबल चार्जर 15 अँम्पिअरच्या सॉकेटमध्ये वापरता येतो. तर फास्ट चार्जरसाठी जास्त पैसे मोजावे लागतात. कोनाचे ग्राहक हा चार्जर ह्युंदाई डिलरशीपमधून घेऊ शकतात.