मोटारसायकलचा क्लच तुटल्यास 'ढकलगाडी'ची नाही येणार वेळ...ही क्लुप्ती करा...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 03:50 PM2018-09-05T15:50:04+5:302018-09-05T15:53:48+5:30
मोटारसायकल चालवत असताना अचानक क्लच वायर तुटल्यास काय हालत होते, याचा प्रत्येकाला केव्हा ना केव्हा अनुभव आलाच असेल. अशावेळी जवळपास मॅकॅनिक न भेटल्यास बाईक ढकलत न्यावी लागते.
मुंबई : मोटारसायकल चालवत असताना अचानक क्लच वायर तुटल्यास काय हालत होते, याचा प्रत्येकाला केव्हा ना केव्हा अनुभव आलाच असेल. अशावेळी जवळपास मॅकॅनिक न भेटल्यास बाईक ढकलत न्यावी लागते. अशा समस्येपासून वाचण्यासाठी काही गोष्टी आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. या क्लुप्तीचा वापर केल्यास मॅकॅनिक किंवा गॅरेजपर्यंत बाईक आरामात जाऊ शकते.
क्लच तुटल्यानंतर बाईक एका जागी उभी करावी. त्यानंतर गिअरमध्ये असेल तर न्युट्रल करावी. यानंतर मोटारसायकलवर बसल्यानंतर हँडल आणि आपले शरीर बॅलंन्स करावे. यानंतर मोटारसायकलचा पिहल्या गिअर टाकावा. परंतू लक्षात असावे की तुम्ही क्लच नसलेली गाडी चालवायला जात आहात. यामुळे गिअर पडताच बाईक पुढे जाण्यासा सुरुवात करेल.
मोटारसायकल पुढे जाऊ लागल्यानंतर गिअरसोबत अॅक्सीलेटर योग्य प्रकारे, प्रमाणात न दिल्यास गाडी बंद पडणे किंवा जोरात पुढे जाऊ शकते. यामुळे बाईकचा गिअर टाकल्यानंतर त्वरित थोडा थोडा अॅक्सीलेटर देण्यास सुरुवात करावी. यामुळे बाईकला पुढे जाण्यास मदत होईल.
गिअर बदलताना मोटारसायकल दचके देईल. यावेळीही लक्षात ठेवावे लागेल की मोटारसायकलला क्लच नाहीय. आपण विना क्लच मोटारसायकल चालवत आहोत.
ट्रॅफिकमध्ये हा प्रयोग नको...
विना क्लच बाईक चालविताना तिचा वेग नियंत्रित असावा. 30 ते 35 किमीच्यावर वेग ठेवू नये. तसेच ट्रॅफिकमध्ये अशी नादुरुस्त बाईक चालविणे टाळावे. तसेच अशी क्लच नसलेली बाईक दुसऱ्या गिअरपर्यंतच चालू शकते. यामुळे अशी बाईक जादा ट्रॅफिक नसलेल्या रस्त्यांवरून गॅरेजपर्यंत न्यावी.