नवीकोरी कार डिफेक्टिव्ह निघाली तर...
By हेमंत बावकर | Published: March 5, 2023 08:59 AM2023-03-05T08:59:44+5:302023-03-05T09:00:03+5:30
आपण कार घेतो तेव्हा आपली स्वप्ने वेगळी असतात; परंतु जर तीच कार डिफेक्टिव्ह निघाली तर? सुरू होतो मानसिक त्रास
आपण कार घेतो तेव्हा आपली स्वप्ने वेगळी असतात; परंतु जर तीच कार डिफेक्टिव्ह निघाली तर? सुरू होतो मानसिक त्रास. कार खरेदी करण्यापूर्वी त्याची तपासणी करणे गरजेचे आहे. शिवाय, तुम्हाला कारचे पीडीआय (प्री-डिलिव्हरी तपासणी) करणे गरजेचे आहे. शोरूममधून कारची डिलिव्हरी घेण्यापूर्वी काही गोष्टी तपासायच्या असतात. त्याला पीडीआय म्हणतात. कार खरेदी करताना, मॉडेल कोणते, किंमत किती, ॲक्सेसरीज कोणत्या दिल्या, रोड टॅक्स किती, फायनान्स सुविधेमध्ये कोणते फायदे, एजंटकडून या सर्वांची माहिती घ्यावी.
टायर, पार्किंग सेन्सर, म्युझिक सिस्टीम, बॅटरी आदी पार्ट नीट काम करत आहेत का, हे तपासावे. एखाद्या पार्टचा नट नाहीय किंवा ढिला लागलाय. विंडशिल्डला क्रॅक गेलेत वा लूझ लागलीय, चारही बाजूला हाताने कुठे गंज लागलाय, कुठला पत्रा खाली-वर किंवा ओबडधोबड दिसतोय का हे तपासावे.
यासाठी तिरप्या पडणाऱ्या लाईटचा देखील आधार घ्यावा. काचेच्या खिडक्या आणि कारच्या दारावर एक बारकोड आहे, ज्यावर काही संख्या लिहिलेल्या असतात. त्या संख्या एकमेकांसारख्या आहेत का ते तपासा. जर असे नसेल तर हे समजून घ्या की कारमध्ये छेडछाड केली गेली आहे.